बॉयफ्रेंड चांगला आहे पण नवरा म्हणून तो चांगला वागेल का? लग्न करण्यापूर्वी वेळीच पाहा ७ गोष्टी...

Updated:March 11, 2026 21:05 IST2026-03-11T21:00:15+5:302026-03-11T21:05:02+5:30

signs your partner will be a good husband : how to know if your boyfriend is husband material : फक्त प्रेम असून चालत नाही, बॉयफ्रेंड चांगला नवरा होऊ शकतो का ? ओळखा ७ सोप्या टिप्स...

बॉयफ्रेंड चांगला आहे पण नवरा म्हणून तो चांगला वागेल का? लग्न करण्यापूर्वी वेळीच पाहा ७ गोष्टी...

कोणावर तरी प्रेम करणं आणि त्याच व्यक्तीसोबत आयुष्यभराचा प्रवास करणं, या दोन अत्यंत वेगळ्या गोष्टी आहेत. डेटिंगच्या काळात सगळंच कसं गुलाबी आणि (signs your partner will be a good husband) स्वप्नवत वाटत असतं. एकमेकांसोबत फिरणं, गप्पा मारणं आणि भेटवस्तू देणं इथपर्यंत सगळं ठीक असतं; पण जेव्हा लग्नाचा विषय येतो, तेव्हा जबाबदाऱ्यांची व्याख्या बदलते. तुमचा बॉयफ्रेंड सध्या तुमच्याशी खूप छान वागत असेल, पण लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या तो पेलू शकेल का? तो संकटात तुमची साथ देईल का? आणि मुख्य म्हणजे, तो एक उत्तम पती होऊ शकतो का? या प्रश्नांची उत्तरं लग्नाआधीच शोधणं कधीही चांगलं. आपण अशा काही खास ट्रिक्स पाहूयात ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमचा पार्टनर लग्नासाठी 'परफेक्ट' आहे की नाही...

बॉयफ्रेंड चांगला आहे पण नवरा म्हणून तो चांगला वागेल का? लग्न करण्यापूर्वी वेळीच पाहा ७ गोष्टी...

संवादादरम्यान तुमचा पार्टनर कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्याची घाई न करता तुमचे संपूर्ण म्हणणे शांतपणे ऐकून घेतो का? जर बोलताना तो तुमच्याशी 'आय कॉन्टॅक्ट' (Eye Contact) ठेवत असेल आणि तुमच्या शब्दांकडे लक्ष देत असेल, तर हे एक सकारात्मक लक्षण आहे. तुमच्या बोलण्यामध्ये वारंवार व्यत्यय न आणणे किंवा विनाकारण तुमचे म्हणणे खोडून न काढणे, हे एक उत्तम पती बनण्याचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते.

बॉयफ्रेंड चांगला आहे पण नवरा म्हणून तो चांगला वागेल का? लग्न करण्यापूर्वी वेळीच पाहा ७ गोष्टी...

छोटं असो किंवा मोठं, तो दिलेलं प्रत्येक वचन पाळण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, त्याने ऑफिस सुटल्यावर तुम्हाला फोन करण्याचं सांगितलं असेल आणि कितीही बिझी शेड्युल असूनही तो ते लक्षात ठेवून फोन करत असेल, तर ते त्याच्या जबाबदार आणि केअरिंग स्वभावाचं लक्षण मानलं जातं. नात्यात विश्वास निर्माण होण्यासाठी अशा छोट्या-छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. अशा सवयींमुळे नातं अधिक घट्ट होऊन टिकत तसेच नात्यातली वीण कायम चांगली राहते.

बॉयफ्रेंड चांगला आहे पण नवरा म्हणून तो चांगला वागेल का? लग्न करण्यापूर्वी वेळीच पाहा ७ गोष्टी...

लग्नानंतर आर्थिक जबाबदाऱ्या दोघांनी मिळून सांभाळल्या तर नात्यात तणाव आणि वाद होण्याची शक्यता कमी होते. एक जबाबदार पुरुष घरातील खर्च, बचत आणि भविष्यासाठीची आर्थिक योजना समजून घेतो आणि त्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेतो. योग्य नियोजन आणि समजूतदारपणे आर्थिक गोष्टी हाताळल्यामुळे नात्यात स्थिरता येते आणि दोघांमध्ये विश्वासही अधिक मजबूत होतो.

बॉयफ्रेंड चांगला आहे पण नवरा म्हणून तो चांगला वागेल का? लग्न करण्यापूर्वी वेळीच पाहा ७ गोष्टी...

जर तुमचा पार्टनर फक्त तुमच्याशीच नाही तर इतर लोकांशीही आदराने आणि सभ्यपणे वागत असेल, तर ते त्याच्या सकारात्मक व्यक्तिमत्त्वाचं लक्षण मानलं जातं. कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी किंवा इतर कोणाशीही तो नम्रपणे वागतो का हे पाहणं महत्त्वाचं असतं. अशा स्वभावामुळे नात्यात परस्पर सन्मान टिकून राहतो आणि भविष्यातील वैवाहिक आयुष्यही अधिक सुखकर आणि स्थिर होण्यास मदत होते.

बॉयफ्रेंड चांगला आहे पण नवरा म्हणून तो चांगला वागेल का? लग्न करण्यापूर्वी वेळीच पाहा ७ गोष्टी...

जर तुमचा पार्टनर आपली चूक जबाबदारीने मान्य करत असेल, तर त्यामुळे नात्यात एक प्रकारचा समतोल आणि शांतता येते. स्वतःची चूक मान्य करणे आणि अहंकार बाजूला ठेवून 'सॉरी' म्हणणे ही एक मोठी 'इमोशनल मॅच्युरिटी' आहे. ही सवय नात्यात विश्वास निर्माण करते आणि नातं अधिक खोलवर रुजण्यास मदत करते. असा जोडीदार वादापेक्षा नात्याला जास्त महत्त्व देतो.

बॉयफ्रेंड चांगला आहे पण नवरा म्हणून तो चांगला वागेल का? लग्न करण्यापूर्वी वेळीच पाहा ७ गोष्टी...

स्वतःचे करिअर किंवा ध्येय गाठण्यासाठी तर प्रत्येकजण लक्षपूर्वक काळजी घेतातच, पण जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या स्वप्नांनाही तितकेच महत्त्व देतो, तेव्हा नातं खऱ्या अर्थाने मजबूत होतं. तुमचे छोटे- मोठे ध्येय पूर्ण करण्यासाठी तो तुम्हाला प्रोत्साहन देत असेल आणि तुमच्या प्रगतीत अडथळा न बनता तुम्हांला मदत करत असेल, तर तो एक उत्तम पती ठरेल यात शंका नाही. तुमच्या प्रगतीत आनंद मानणारा आणि तुमच्या ध्येयांमध्ये साथ देणारा पार्टनर नातं अधिक मजबूत आणि विश्वासपूर्ण बनवण्यास मदत करतो.

बॉयफ्रेंड चांगला आहे पण नवरा म्हणून तो चांगला वागेल का? लग्न करण्यापूर्वी वेळीच पाहा ७ गोष्टी...

जो पुरुष आपल्या नात्यांना महत्त्व देतो, त्याचे आपल्या जवळच्या लोकांशी नेहमीच नातं अधिक घट्ट असतं. 'फॅमिली मॅन' समजले जाणारे पुरुष केवळ त्यांच्या कुटुंबाचाच विचार करत नाहीत, तर आपल्या पार्टनरशी देखील तितक्याच प्रामाणिकपणे आयुष्यभर साथ देतात. आपल्या बिझी शेड्युलमधून कुटुंबासाठी वेळ काढणे आणि नात्यांमधील ओलावा टिकवून ठेवणे, हे एका चांगल्या पतीचे सर्वात मोठे लक्षण आहे.