1 / 7फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी व्हॅलेण्टाइन्स वीक साजरा होतो. त्यातलाच एक महत्त्वाचा दिवस म्हणजे रोज डे. आपल्याला जो आवडतो किंवा जी आवडते तिला तर लाल गुलाब देतात येतातच पण आपल्या आयुष्यातल्या अन्य महत्त्वाच्या व्यक्तींना कोणत्या रंगाचं फूल द्याल? ही घ्या यादी, बघा कुणाला कोणते फूल द्यायचे..2 / 7लाल गुलाब प्रेमाची देवी ग्रीक ऍफ्रोडाइटशी संबंधित आहे. जेव्हा तिचा प्रियकर, ॲडोनिस जखमी झाला होता, तेव्हा ती आपल्या प्रियकराकडे धावत गेली, धावत असताना त्यांच्या पायांना काटे टोचले. त्यांच्या रक्ताने गुलाब आणखी लाल झाले. त्यामुळे लाल गुलाबाचे रूपांतर अमर प्रेम आणि रोमँटिक प्रेमाच्या प्रतीकात झाले. प्रेम व्यक्त करण्यासाठीच लाल गुलाब दिला जातो.3 / 7आपण आपल्या मित्र अथवा मैत्रिणीला गुलाबाचे फुल देऊन हा रोज डे साजरा करू शकतो. जर आपल्याला एखादी व्यक्ती आवडत असेल, तर त्यांना देखील आपण पिंक गुलाब देऊ शकतो. याने आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीसमोर मांडणे सोपे जाईल.4 / 7आपण हा व्हॅलेंटाईन्स डे मैत्री या नात्यापासून सुरुवात करू शकता. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीसोबत फ्रेंडशिप ठेवायची असेल तर, त्यांना पिवळ्या रंगाचे गुलाब द्या. स्पेशल वाटेल.पिवळा गुलाब हा समोरच्या व्यक्तीबद्दल काळजी दाखवते.5 / 7रोज डेच्या दिवशी आपल्याला जर कोणाला धन्यवाद म्हणायचे असेल तर, त्यांना पीच रंगाचा गुलाब देऊन थँक्स म्हणा. आपण त्यांना पुष्पगुच्छ अथवा एक पीच रंगाचा गुलाब देऊन धन्यवाद म्हणू शकता. याव्यतिरिक्त आपण पीच रंगाचा गुलाब देऊन सौंदर्याची प्रशंसा देखील करू शकता.6 / 7केशरी रंगाचा गुलाब उत्साह आणि उत्कटतेचे प्रतीक आहे. याशिवाय जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर त्यांना केशरी रंगाचा गुलाब द्या. 7 / 7एखाद्याला पांढरे गुलाब देणे म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दल विचार करायला आवडते, त्यांच्यासोबत राहायला आवडते. पांढरा रंग हा शांतता आणि पवित्रताचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला पांढरा गुलाब देऊन तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता.