Join us   

MS Dhoni Sakshi Dhoni Romance : १४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी धोनीला भेटली होती साक्षी; कॅप्टन कूलचा रोमॅन्टीक अंदाज, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 5:19 PM

1 / 8
चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) पत्नी साक्षी धोनी (Sakshi Dhoni) आणि मुलगी झिवा धोनीसोबत (Ziva Dhoni) जयपूर येथे काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नाला गेला आहे. या भव्य लग्नातून माही आणि साक्षीचे काही अतिशय गोंडस फोटो समोर आले आहेत. या लग्नात महेंद्र सिंह धोनी आणि साक्षी धोनी यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. दोघेही एकमेकांपासून नजर हटवू शकत नव्हते.
2 / 8
हे फोटो साक्षी धोनीने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोमध्ये साक्षी माहीकडे प्रेमानं पाहत असल्याचे पाहायला मिळत आहे.
3 / 8
साक्षीने महेंद्रसिंग धोनीसोबत डान्स केला. या लग्नात दोघेही आपापल्या स्टाइलमध्ये एन्जॉय करताना दिसले.
4 / 8
साक्षी धोनी नुकतीच तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या बातमीमुळे चर्चेत आली होती. अशा परिस्थितीत धोनीच्या चाहत्यांसाठी ही छायाचित्रे अधिक खास आहेत.
5 / 8
महेंद्रसिंग धोनी आणि साक्षीची रोमान्समध्ये मग्न असलेली ही स्टाईल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहते त्यांच्या या फोटोंवर भरभरून प्रेम करत आहेत.
6 / 8
झिवा धोनीची ही छायाचित्रेही या भव्य लग्नातून समोर आली आहेत
7 / 8
भव्य सजावटीमध्ये बसलेल्या झिवाच्या गोंडस फोटोनं चाहत्यांना वेड लावलं आहे.
8 / 8
या निमित्तानं साक्षीनं इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिलंय, एकमेकांना ओळखण्याला १४ वर्ष पूर्ण झाली. चिअर्स. या फोटोत महेंद्रसिंग धोनी सूट-बूटमध्ये दिसत आहे, तर साक्षीनेही ट्रडिशनल कपड्यांमध्ये दिसत आहे.
टॅग्स : रिलेशनशिपरिलेशनशिपमहेंद्रसिंग धोनी