1 / 7१९ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने आपापल्या आयुष्यात आलेल्या पुरुषाला कित्येक जणींनी खूप खूप शुभेच्छा दिल्याच आहेत..2 / 7बाबा, भाऊ, मित्र म्हणून तर काही पुरुष ग्रेट असतातच.. पण जेव्हा नवरा म्हणून ते एखादीच्या आयुष्यात येतात तेव्हा तिच्यासारखी सुखी, आनंदी तीच... असेच काही पुरुष बॉलीवूडमध्येही आहेत. ऑनस्क्रिन रोमान्स करताना तर आपण त्यांना पाहिलेलं आहेच, पण खऱ्याखुऱ्या आयुष्यातही ते आपल्या बायकोवर जीव ओवाळून टाकतात. असे सेलिब्रिटी नवरे कोण ते पाहूया..3 / 7पहिली जोडी आहे रितेश आणि जेनेलियाची. ते दोघे तर महाराष्ट्रात दादा आणि वहिनी म्हणून प्रचंड हिट आहेत. त्यांच्यातली समज, मैत्री आणि नात्यातला गोडवा त्यांच्या चाहत्यांना मनापासून आवडतो.4 / 7सैफिना म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूर हे असंच एक जोडपं.. दोघेही आपापली स्पेस जपत काम करतात, मुलंही सांभाळतात आणि नात्याचा आनंद घेत एकमेकांच्या पाठीशी भक्कम आधार म्हणूनही उभे राहतात.5 / 7शाहरुख खानचं त्याच्या पत्नीवर म्हणजेच गौरीवर असणारं प्रेम तर अनेकदा कित्येक कॅमेऱ्यांनी टिपलेलं आहे. तो नेहमीच गौरीला एखाद्या राजकुमारीसारखं ट्रिट करतो. ते पाहून त्याच्या महिला चाहत्या तर त्याच्यावर आणखीनच फिदा होतात.6 / 7शाहिद कपूर आणि मीरा कपूर हे आणखी एक छान जोडपं. त्यांच्यामध्ये तब्बल ११ वर्षांचं अंतर आहे. पण त्यांच्या नात्यात वयाचा अडसर कधीच येत नाही...7 / 7विराट कोहली याचं नाव या यादीत घेतल्याशिवाय ही यादी पुर्णच होऊ शकत नाही. त्याचं अनुष्कावर असणारं प्रेम तो अख्ख्या जगाला वेळोवेळी दाखवतो.. तिच्यासाठी तो म्हणजे एक उत्कृष्ट मित्र आणि नवरा असून आम्ही दोघे सोबत असलो की तिथेच आमचं जग संपतं असं अनुष्का नेहमीच म्हणते..