1 / 8बॉलिवूडची ब्यूटी क्वीन आणि ग्लोबल आयकॉन ऐश्वर्या राय - बच्चन आपल्या प्रोफेशनल (Aishwarya Rai interview on work life balance) आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्याचा देखील सुंदर समतोल राखते. घर, करिअर आणि जबाबदाऱ्या यांचा योग्य मेळ घालण्यासाठी ती नेमकं काय करते? तिच्या लाइफस्टाईलमधील काही खास टिप्स आणि सिक्रेट्स आपण पाहूयात. 2 / 8‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये ऐश्वर्याने (Aishwarya Rai interview on work life balance) सांगितलं होतं की, लग्न हे आपल्या करिअरमध्ये (Aishwarya Rai shared her way to balance between family and career) अडथळा ठरू नये. तिच्या मते, एखादी स्त्री इच्छाशक्ती आणि समजूतदारपणाने प्रोफेशन आणि घर अशा दोन्ही गोष्टी अगदी उत्तम पद्धतीने सांभाळू शकते. 3 / 8 जेव्हा दोन्ही पार्टनर कामात व्यस्त असतात, तेव्हा दररोज एकमेकांत संवाद होणं शक्य नसते. पण एखादवेळी साधी विचारपूस 'कसा आहेस?' असं विचारणं, दिवसाची सुरुवात एका प्रेमळ मेसेजने करणं, किंवा दिवसभरानंतर 'खूप थकलास का?' असं विचारणं हे नात्यातला आपलेपणा टिकवून ठेवतं. प्रेम नेहमी मोठ्या गोष्टींत नसतं, तर अशा छोट्या छोट्या हळव्या क्षणांमध्ये लपलेलं असतं.4 / 8दिवस कितीही बिझी असला, तरी किमान ५ ते १० मिनिटांचा वेळ एकमेकांसाठी नक्की काढा. एखादा कॉल, व्हॉइस नोट किंवा व्हिडिओ मेसेजही नात्यात ताजेपणा आणि उत्साह निर्माण करतो. अशा लहानशा प्रयत्नांमुळे तुमच्या नात्यांतील वीण अधिक घट्ट होते. 5 / 8 अनेकदा आपण आपल्या जोडीदाराशी फक्त कामाच्याच आणि जबाबदाऱ्यांशी संबंधित गोष्टीच बोलतो. पण आपल्या भावना शेअर करणं तितकंच महत्त्वाचं असतं. दिवसातील एखादा मजेशीर क्षण, एखादी अडचण किंवा मनाला स्पर्शून गेलेली एखादी चांगली गोष्ट शेअर करा अशा गोष्टी तुमचं नातं अधिक घट्ट आणि विश्वासाचं बनवतात.6 / 8जर तुम्ही एकमेकांपासून दूर असाल, तर टेक्नॉलॉजीचा वापर करा. व्हिडीओ कॉलवर एकत्र जेवण करणे, वेगवेगळ्या ठिकाणी असूनही एकच सिनेमा पाहून त्यावर चर्चा करणे, ऑनलाइन गेम्स खेळणे या सगळ्या गोष्टी नात्यात मजा आणि जवळीक टिकवून ठेवतात.7 / 8जेव्हा तुम्ही भेटता, तेव्हा शक्य तितका वेळ फक्त तुमच्यासाठी ठेवा. त्या वेळेत काही छान गोष्टी एकत्र करा – एकत्र स्वयंपाक करा, फिरायला जा किंवा जुन्या आठवणींना उजाळा द्या.8 / 8 लग्नानंतर हळूहळू आपण एकमेकांचं कौतुक करणं विसरतो. पण एखाद्या लहानातल्या लहान गोष्टीचे देखील कौतुक करा मग ते कपड्यांबद्दल असो किंवा केलेल्या एखाद्या कामाबद्दल याचा नात्यावर खूप सकारात्मक परिणाम होतो. जेव्हा तुम्ही एकमेकांच्या प्रयत्नांची दखल घेता, तेव्हा समोरच्याला आपलं महत्त्व वाटतं आणि नातं अधिक घट्ट होतं.