Join us   

परीक्षेच्या काळात मुलांना ३ पदार्थ खायला द्या, स्मरणशक्ती- एकाग्रता वाढेल, पेपर सोपे जातील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2024 12:55 PM

1 / 7
विद्यार्थांनी वर्षभर जी मेहनत घेतलेली असते, त्याचा समारोप म्हणजे वार्षिक परीक्षा. दहावी- बारावीच्या वार्षिक परीक्षा सुरू होऊन आता संपतही आल्या आहेत.
2 / 7
लवकरच इतर वर्गांच्या परीक्षाही सुरू होतील. अभ्यास तर सगळा झाला होता. पण मला उत्तर आठवतच नव्हतं, अशी तक्रार अनेक विद्यार्थी करतात. म्हणूनच परीक्षेच्या काळात आणि खरंतर कमी वयापासूनच मुलांना काही पदार्थ नियमितपणे खायला दिले पाहिजेत.
3 / 7
ते पदार्थ नेमके कोणते आणि ते खाल्ल्याने काय होतं, याविषयीची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी chitchatrajlaviandrajeshwarisachdev या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. डॉक्टर सांगतात की हे पदार्थ खाल्ल्यामुळे ब्रेन सेल्स रिपेअर व्हायला मदत होते. मेंदूला ऑक्सिजन आणि ग्लुकोज यांचा चांगला पुरवठा होतो आणि मेंदूचे आरोग्य उत्तम राहते.
4 / 7
मेंदूचे आरोग्य चांगले असल्यास स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा...
5 / 7
यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे ब्राह्मी. दिवसातून दोन वेळा १- १ टीस्पून ब्राह्मी पावडर मुलांना द्या.
6 / 7
शंखपुष्पीही मुलांच्या मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे.
7 / 7
स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारा आणखी एक पदार्थ म्हणजे पेठा ज्या फळापासून तयार करतात ते पेठ्याचं फळ. यालाच Ash Gourd किंवा kushmanda असंही म्हणतात. त्याचा ज्सूस रोज सकाळी नियमित पिणे मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.
टॅग्स : पालकत्वविद्यार्थीपरीक्षाअन्नघरगुती उपाय