दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

Updated:April 25, 2025 17:42 IST2025-04-25T17:33:46+5:302025-04-25T17:42:58+5:30

मुलांमध्ये इतकी एनर्जी असते की पालक त्यांच्या मागे धावताना थकतात पण मुलं अजिबात थकत नाहीत.

दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

सर्व पालक आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. असं असलं तरी प्रत्येक मूल हे वेगळं असतं, काही मुलं स्वभावाने थोडी खोडकर, मस्तीखोर असतात तर काही एकदम शांत किंवा लाजाळू असतात.

दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुमचं मूल दिवसभर उड्या मारत राहतं, सांगितल्यावरही एका जागी बसत नाही, खूपच मस्ती करतं, तर तुमचा मुलगा किंवा मुलगी हे हायपर एक्टिव्ह आहेत. अशा मुलांमध्ये इतकी एनर्जी असते की पालक त्यांच्या मागे धावताना थकतात पण मुलं अजिबात थकत नाहीत.

दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

हायपर एक्टिव्ह मुलांना ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांना कोणाचंही ऐकत नाहीत. अशी मुलं सहज अस्वस्थ, निराश आणि दुःखी होतात. ही मुले इतरांचं कमी ऐकतात आणि जास्त बोलतात.

दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

हायपर एक्टिव्ह मुलांसाठी सर्वप्रथम एक रुटीन तयार करा. ज्यामध्ये त्यांच्या अभ्यासापासून खेळ, जेवण आणि झोपेपर्यंत सर्व गोष्टींसाठी निश्चित वेळ ठरवा. यामुळे मुलांच्या वागण्यात बदल होऊ शकतो.

दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

हायपर एक्टिव्ह मुलांना खेळ, डान्स, स्विमिंग किंवा इतर कोणत्याही शारीरिक हालचाली असलेल्या गोष्टींमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करा. असं केल्याने त्यांची एनर्जी सकारात्मक दिशेने वापरली जाईल. यासाठी दररोज ३० मिनिटं वेळ नक्की काढा.

दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

मुलांचं वर्तन समजून घेताना थोडा संयम ठेवा. अशा मुलांना रागावणं किंवा शिक्षा करणं टाळा कारण यामुळे ते अस्वस्थ होऊ शकतात. त्यांच्या भावना समजून घ्या आणि सहानुभूती दाखवा.

दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

कोडी सोडवा, चित्र काढा, बुद्धी तल्लख करणारे गेम खेळा. दिवसातून १५-२० मिनिटं मुलाला खेळायला द्या. बाहेर फिरायला घेऊन जा.

दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

दिवसातून १-२ तासांपेक्षा जास्त वेळ टीव्ही, मोबाईल किंवा टॅबलेटसारख्या गोष्टी वापरायला देऊ नका. जास्त स्क्रीन टाईममुळे मुलांचं नुकसान होऊ शकतं.