उन्हाळ्याच्या सुटीत घरी तासंतास मोबाइल पाहणाऱ्या मुलांचं करायचं काय? पाहा १० उपाय, मुलंही खुश...
Updated:May 20, 2025 18:18 IST2025-05-20T17:48:08+5:302025-05-20T18:18:23+5:30
9 Activities to Keep Your Kid Away from Mobile Screens During This Summer Vacation : 9 Tips To Keep Kids Away From Screens During Summer Vacation : 9 screen-free activities to wean kids off their screens : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी सोपे, उपयोगी आणि फायदेशीर उपाय...

सध्या मुलांना उन्हाळ्याची सुट्टी पडली असल्याने, मुले बहुतांश वेळ घरीच (9 Activities to Keep Your Kid Away from Mobile Screens During This Summer Vacation) असतात. सुट्टी पडल्याने अभ्यासापासून सुटका असल्याने मुलांकडे भरपूर मोकळा वेळ असतो. याच मोकळ्या वेळेत मुलांकडून मोबाईल, टॅबलेट, टीव्ही यांचा वापर वाढण्याची शक्यता जास्त असते. स्क्रीन टाइम वाढल्यामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोघांवर परिणाम होऊ शकतो. यामुळे डोळ्यांवर ताण, झोपेचा त्रास, चिडचिडेपणा, एकटेपणा यांसारख्या समस्या मुलांमध्ये हळूहळू दिसू लागतात.
यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी (9 Tips To Keep Kids Away From Screens During Summer Vacation) काही सोपे, उपयोगी आणि फायदेशीर उपाय पाहूयात.
१. स्क्रीन टाइमसाठी वेळेची मर्यादा ठेवा :-
दिवसातून किती वेळ स्क्रीन पाहायची हे मुलांनी आणि पालकांनी एकत्रित बसून ठरवायला हवे. उदा. दिवसांतून १ ते २ तास स्क्रीन पाहायची अशी मोजून मापून वेळ ठरवून द्यावी. एवढचं नाही तर त्या वेळेचे काटेकोरपणे पालन करावे. मोबाईल किंवा टीव्ही नेहमी दिवसभर सतत चालू ठेव नये.
२. दिवसाचे वेळापत्रक आखा :-
मुलांसाठी सुट्टीच्या दिवसांचे वेळापत्रक तयार करा. यात वाचन, खेळ, चित्रकला, अभ्यास, घरकाम यासारख्या कामात मुलांचा वेळ कसा खर्ची होईल याची विभागणी करा. यामुळे मुलं सतत दिवसभर कोणत्या ना कोणत्या गोष्टीत रमून राहतील, परिणामी, त्यांना टी. व्ही , मोबाईल अशा स्क्रीन पाहायला वेळच मिळणार नाही.
३. क्रिएटिव्ह आणि शारीरिक ऊर्जा लागेल असे प्लॅन करा :-
पेंटिंग, हस्तकला, हस्ताक्षर सुधारणा, नृत्य, योगा, गाणी शिकणे अशा गोष्टी मुलांना देऊन त्यांच्या वेळाचा सदुपयोग करा. क्रिएटिव्ह आणि शारीरिक ऊर्जा खर्ची होईल अशा वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीज मुलांकडून करून घ्या. जेणेकरून मुलं त्यात बिझी राहतील, यामुळे त्यांना स्क्रीनकडे बघण्यासाठी देखील वेळ मिळणार नाही.
४. मैदानी खेळ, आउटडोअर अॅक्टिव्हिटीजला प्राधान्य द्या :-
मुलांना दररोज थोडा वेळ तरी घराबाहेर खेळायला द्या. सायकल चालवणे, बॅडमिंटन, क्रिकेट, खो-खो, धावणे इ. खेळ मुलांना अॅक्टिव्ह आणि स्क्रीनपासून दूर देखील ठेवतात.
५. कुटुंबियांसोबत वेळ घालवा :-
सगळं कुटुंब एकत्र बसून खेळ खेळा (कॅरम, लुडो, बुद्धिबळ), गप्पा मारा, किंवा काही सोपी काम एकत्र करा. यामुळे मुलांना पालकांसोबत काहीतरी वेगळं केल्याचा आनंद मिळेल तसेच त्यांचा स्क्रीनटाईम देखील कमी होईल.
६. वाचनाची गोडी लावा :-
वयाला साजेशी पुस्तके (चित्रकथा, गोष्टी, साहसकथा, विज्ञानविषयक) आणून मुलांना वाचनाची सवय लावा. रोज काही वेळ "पुस्तक वाचनासाठीचा वेळ" म्हणून नेमून ठेवा.
७. घरगुती कामात सहभागी करून घ्या :-
स्वयंपाक, कपड्यांना घडी घालणे, बागकाम, पाणी घालणं अशा छोट्या कामांत सहभागी करून घेतल्यास त्यांना जबाबदारी आणि स्वावलंबन यासारख्या गोष्टी शिकता येतात.
८. मुलांना स्पर्धा, आव्हानं, चॅलेंजेस द्या :-
घरीच ड्रॉईंग स्पर्धा, कथा सांगण्याची स्पर्धा, 'नो मोबाइल डे' सारखी आव्हानं मुलांना द्या, यातून मुलांना आनंदही मिळतो आणि मुलं स्क्रीनपासून दूर राहतात.
९. योगा आणि मेडिटेशन करा :-
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा, ध्यान, आणि थोडा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. यासाठी सुट्टी ही योग्य वेळ आहे.
१०. स्वतः स्क्रीन वापरण्याचा आदर्श ठेवा :-
मुलं जे पाहतात तेच शिकतात. जर पालक सतत मोबाईलवर असतील, तर मुलंही तसंच करतात. त्यामुळे स्वतःही स्क्रीनचा मर्यादित वापर करा. मुलांच्या सुट्टीचा वेळ त्यांच्यासोबत घालवायला विसरु नका.