Women's Day 2026: वर्षभर सर्वांसाठी धावतेस पण बाई गं तुझ्या आनंदासाठी काय करतेस? खरं सांग, काय खुपतंय..

Updated:March 6, 2026 09:36 IST2026-03-05T16:06:13+5:302026-03-06T09:36:38+5:30

Self-love tips for busy women: Womens day 2026: स्वतःचे आयुष्य बदलण्यासाठी काय करायला हवं पाहूया.

Women's Day 2026: वर्षभर सर्वांसाठी धावतेस पण बाई गं तुझ्या आनंदासाठी काय करतेस? खरं सांग, काय खुपतंय..

सकाळचा चहा बनवण्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत, मुलांचे डबे, ऑफिसचे टार्गेट्स, घरची कामे आणि इतरांच्या गरजा.. स्त्रीचं आयुष्य म्हणजे धावपळीचा अविरत प्रवास. या प्रवासात कुटुंबाला सुखी ठेवणं, त्यांना आधार देणं. पण या गडबडीत आपण स्वत:ला विसरतो. (Self-love tips for busy women)

Women's Day 2026: वर्षभर सर्वांसाठी धावतेस पण बाई गं तुझ्या आनंदासाठी काय करतेस? खरं सांग, काय खुपतंय..

यंदाच्या महिलादिनी इतरांसाठी काही करण्यापेक्षा स्वत:साठी काय करता येईल याचा विचार करा. वर्षाचे ३६४ दिवस सर्वांसाठी धावल्यानंतर, त्या ३६५ व्या दिवशी स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही काय करता? स्वतःचे आयुष्य बदलण्यासाठी काय करायला हवं पाहूया. (Womens day 2026)

Women's Day 2026: वर्षभर सर्वांसाठी धावतेस पण बाई गं तुझ्या आनंदासाठी काय करतेस? खरं सांग, काय खुपतंय..

ज्या गोष्टी तुम्हाला मानसिक थकवा देतात किंवा ज्या तुमची जबाबदारी नाही, अशा गोष्टींना ठामपणे नाही म्हणायला शिका. तुमचा वेळ मौल्यवान आहे, तो कुठे खर्च करायचा हे लक्षात घ्या.

Women's Day 2026: वर्षभर सर्वांसाठी धावतेस पण बाई गं तुझ्या आनंदासाठी काय करतेस? खरं सांग, काय खुपतंय..

बऱ्याच वर्षांपूर्वी आपल्याला पेटिंग, वाचन, डान्स किंवा बागकामाची आवड असेल, ते पुन्हा सुरु करा. स्वत:ला प्राधान्य द्या, हे देखील एक प्रकारचे मेडिटेशन आहे.

Women's Day 2026: वर्षभर सर्वांसाठी धावतेस पण बाई गं तुझ्या आनंदासाठी काय करतेस? खरं सांग, काय खुपतंय..

फक्त कुटुंबाचे आरोग्य सांभाळणं पुरेसे नाही तर स्वत:च्या शरीराकडे आणि मनाकडे लक्ष द्या. वेळेवर चेकअप करा, व्यायामाची आवड जोपासा आणि तणावमुक्त राहण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

Women's Day 2026: वर्षभर सर्वांसाठी धावतेस पण बाई गं तुझ्या आनंदासाठी काय करतेस? खरं सांग, काय खुपतंय..

पैसे कमावणं हे आर्थिक स्वातंत्र्य नाही तर ते पैसे कसे गुंतवायचे आणि स्वत:चे निर्णय कसे घ्यायचे, हे शिकणं महत्त्वाचे आहे. स्वत:चे आर्थिक निर्णय स्वत:घेण्यास सुरुवात करा.

Women's Day 2026: वर्षभर सर्वांसाठी धावतेस पण बाई गं तुझ्या आनंदासाठी काय करतेस? खरं सांग, काय खुपतंय..

एकदिवस डिजिटल डिटॉक्स करा. सोशल मीडियाच्या परफेक्ट जगापासून दूर राहा. कोणाशीही स्वत:ची तुलना करु नका. जे आहात तसे स्वत:ला स्वीकारा.