1 / 6घरातल्या महिलांच्या मागे हजार कामं असतात. घर, ऑफीस, मुलं, त्यांच्या शाळा, सणवार, पाहुणे, घरातल्यांची आजारपणं... अशा कित्येक पातळ्यांवर त्यांना एकाचवेळी लढावं लागतं. 2 / 6त्या लक्षात ठेवून बऱ्याच गोष्टी करतात. पण तरीही छोटी- मोठी कामं विसरून जातात. वेळ गेल्यावर मग लक्षात येतं की अमूक एक काम करायचंच राहिलं.. त्यामुळे मग ताण वाढत जातो. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा..3 / 6कामांसाठी टाईम बॉक्स तयार करा. म्हणजेच घरातली कामं दिवसाच्या अमूक अमूक वेळेत करायची आहेत. मग काही झालं तरी तो वेळ घरातल्या कामांसाठीच ठेवा. आपोआप कामं सुचत जातील.4 / 6एक छोटी डायरी आणि पेन घ्या. किंवा कॅलेंडरवर तुमच्या कामांची यादी लिहून ठेवा. काम झालं की लगेच त्यावर टिकमार्क करा. म्हणजे काय झालं आहे ते ही कळेल आणि काय राहीलं आहे याची पुन्हा रिव्हिजन होईल.5 / 6मोबाईलचा वेळ ठरवून टाका. कारण आपण मोबाईल हातात घेतला की त्यात पुढचा कित्येक वेळ रमून जातो आणि मग लक्षात असलेली कामंही विसरून जातो. त्यामुळे मोबाईलवर सोशल मीडिया ठराविक वेळेतच पाहायचं हे ठरवून घ्या. 6 / 6सकाळी उठल्यानंतर चहा घेऊन झाल्यावर थोडा वेळ डोळे मिटून शांत बसा आणि मनातल्या मनात आज काय काम करायचं आहे, याची उजळणी करा. कामं दिवसभर लक्षात राहतील.