स्वत:शीच बोलता, रात्री उशिरापर्यंत जागता? बुद्धिमान लोकांच्या असतात ५ सवयी, पाहा तुम्हालाही आहेत का?

Updated:April 6, 2026 20:00 IST2026-04-06T20:00:00+5:302026-04-06T20:00:02+5:30

Common habits of people with high IQ: Curiosity and intelligence connection: सायकॉलॉजीनुसार बुद्धिमान लोकांच्या अशा ५ सवयी, ज्या कदाचित आपल्याही असतील.

स्वत:शीच बोलता, रात्री उशिरापर्यंत जागता? बुद्धिमान लोकांच्या असतात ५ सवयी, पाहा तुम्हालाही आहेत का?

नेहमी स्वतःशीच पुटपुटणे, रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असणे किंवा कामाच्या टेबलावर असलेला पसारा... या गोष्टींना आपण सहसा 'विचित्र' किंवा 'गोंधळलेपणा' समजतो. पण सायकॉलॉजी आणि मेंटल हेल्थ सायन्स काहीतरी वेगळंच सांगतं. आपण अनेकदा अशा लोकांना पाहतो जे जगाच्या चौकटीत बसत नाहीत, पण त्यांच्या विचारांची धाटणी मात्र विलक्षण असते. एखाद्या व्यक्तीचा बुद्ध्यांक केवळ त्याच्या मार्कशीटवरून ठरत नाही, तर त्याच्या दैनंदिन सवयी आणि मानसिक स्थितीवरूनही ओळखता येतो. (Common habits of people with high IQ)

स्वत:शीच बोलता, रात्री उशिरापर्यंत जागता? बुद्धिमान लोकांच्या असतात ५ सवयी, पाहा तुम्हालाही आहेत का?

अल्बर्ट आइन्स्टाईनपासून ते अनेक मोठ्या विचारवंतांपर्यंत, अशा काही सवयी दिसून आल्या आहेत ज्या सामान्य माणसाला कदाचित 'अजब' वाटू शकतात. विज्ञानानुसार, अतिशय बुद्धिमान लोकांचा मेंदू इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करत असतो. जाणून घेऊया सायकॉलॉजीनुसार बुद्धिमान लोकांच्या अशा ५ सवयी, ज्या कदाचित आपल्याही असतील. ( Curiosity and intelligence connection)

स्वत:शीच बोलता, रात्री उशिरापर्यंत जागता? बुद्धिमान लोकांच्या असतात ५ सवयी, पाहा तुम्हालाही आहेत का?

अनेकदा एकटे बडबडणाऱ्या लोकांना वेड्यात काढलं जातं. पण संशोधनानुसार हे उच्च बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. स्वतःशी बोलल्यामुळे आपला मेंदू अधिक एकाग्र होतो, विचारांची स्पष्टता वाढते आणि कठीण समस्या सहज सोडवता येते.

स्वत:शीच बोलता, रात्री उशिरापर्यंत जागता? बुद्धिमान लोकांच्या असतात ५ सवयी, पाहा तुम्हालाही आहेत का?

लवकर निजे, लवकर उठे' हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. पण संशोधनानुसार ज्यांचा IQ जास्त असतो. त्याची बुद्धीमत्ता रात्रीच्या वेळी जास्त क्रिएटिव्हली काम करते. रात्रीच्या वेळी बाह्य अडथळे कमी असल्याने मेंदू अधिक वेगाने आणि सखोल विचार करतो.

स्वत:शीच बोलता, रात्री उशिरापर्यंत जागता? बुद्धिमान लोकांच्या असतात ५ सवयी, पाहा तुम्हालाही आहेत का?

बुद्धिमान लोक अनेकदा छोट्या छोट्या गोष्टी विसरतात. याचं कारण असं की त्यांचा मेंदू अनावश्यक माहिती गाळून फक्त महत्त्वाच्या आणि क्लिष्ट विषयांवर लक्ष केंद्रित करतात. याला सिलेक्टिव्ह मेमरी असंही म्हटलं जातं.

स्वत:शीच बोलता, रात्री उशिरापर्यंत जागता? बुद्धिमान लोकांच्या असतात ५ सवयी, पाहा तुम्हालाही आहेत का?

आपले कामाचे नियोजन आणि खोली नेहमीच विस्कटेलील असेल तर आपले माइंड खूप क्रिएटिव्ह असते. सायकॉलॉजीनुसार, नीटनेटकेपणापेक्षा पसाऱ्यात काम करणाऱ्या लोकांकडे नवीन कल्पना (Out of the box thinking) शोधण्याची क्षमता जास्त असते.

स्वत:शीच बोलता, रात्री उशिरापर्यंत जागता? बुद्धिमान लोकांच्या असतात ५ सवयी, पाहा तुम्हालाही आहेत का?

बुद्धिमान लोक कधीच समाधानी नसतात, त्यांना प्रत्येक गोष्टीमागे का आणि कसे जाणून घ्यायचे असते. त्यांची शिकण्याची भूक कधीच संपत नाही. साध्या गोष्टींकडेही ते वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात.