फक्त ९ गोष्टी, मेंदू करतात एकदम तल्लख! वय वाढलं तरी मेंदू म्हातारा होणार नाही
Updated:January 28, 2025 20:40 IST2025-01-28T20:27:03+5:302025-01-28T20:40:37+5:30
Do Only 9 Things, Your Brain Will Work Brilliantly! : दहा सवयी लावा मग बघा मेंदू कसा तल्लख होतो.

बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी औषधं घेण्याची काहीच आवश्यकता नसते. हे दहा उपाय करून बघा. बुद्धी अगदी तल्लख राहण्यास मदत होईल. स्मरणशक्ती ही चांगली राहील.
१.चांगली झोप
आठ तासाची झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. डोक्याला आरामाची गरज असते. आणि तो झोपल्यावरच मिळू शकतो. झोपण्यापूर्वी मोबाइल वापरणे सोडून द्या. आकलनशक्ती योग्य झोपेनंतर वाढते.
२.व्यायाम
दिवसातून किमान दोन तास तरी व्यायाम करा. डोक्याकडे जाणारा रक्तस्त्राव व्यायाम केल्यावर चांगला होतो. मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवायचे असेल तर शारीरिक स्वास्थ्य चांगले हवे.
३.ध्यान
बुद्धी तल्लख करण्यासाठी ध्यान लावणे गरजेचे असते. नको ते विषय डोक्यातून काढल्यावर योग्य विचारांसाठी जागा होते. दिवसातून दहा मिनिटे तरी ध्यानस्थ बसा.
४.नवीन गोष्टी शिका
सतत काही ना काही नवीन शिकत राहा. वाद्ये शिका, खेळ शिका. तसेच बुद्धिबळासारखे खेळ खेळत नसाल तर, खेळायला शिका. भाषा शिकत राहा. मेंदूला चालना मिळेल अशा गोष्टी शिका.
५.पौष्टिक आहार
आहारात पौष्टिक अन्नच खा. शरीरासाठी उपयुक्त अशा जीवनसत्त्वांनी, प्रथिनांनी, लोहाने परिपूर्ण असलेले पदार्थ आहारात घ्या. मेंदूसाठी चांगले असे बदाम खा. सुकामेवा खा.
६.मल्टीटास्कींग असाल तर सांभाळून
एका वेळी अनेक गोष्टी करता येणं नक्कीच कौशल्याचं आहे. पण अति गोष्टी एकाच वेळी केल्याने मेंदूवर ताण यायला लागतो. त्यामुळे आत्ता खुप गोष्टी केल्यात तरी काही वर्षांनी मेंदू थकायला लागेल.
७.चांगल्या समूहात राहा
चलनात्मक चर्चा करणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहा. विविध गोष्टीवर चर्चा केल्याने माहितीचा साठा वाढतो. नवनव्या गोष्टी कळतात, विचारांची देवाण घेवाण होते. यातून मेंदूला चालना मिळते. त्याची कार्यक्षमता वाढते.
८.आव्हानात्मक राहा
आपल्याला न जमणाऱ्या गोष्टीसुद्धा करायचा प्रयत्न करा. मेंदूचा सराव वाढेल. अशा आव्हानांना स्वीकारा. एखादी गोष्ट जमतच नाही तर ती करायचा प्रयत्न करत राहा. मेंदूची कार्यक्षमता वाढेल.
९.डिहायड्रेशनचा दुष्परिणाम
डिहायड्रेशनचा परिणाम फक्त शरीरावर नाही तर मेंदूवरही होतो. आकलनशक्ती कमी होते. मेंदू काम करायचा बंद होतो. मेंदू आणि शरीर क्रियांमधील संतुलन बिघडून जाते.