1 / 7सध्याच्या धावपळीच्या जगात मानसिक ताण, स्ट्रेस, डिप्ररेशन किंवा अचानक मूड खराब होण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कामाचा व्याप, घरच्या जबाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता यामुळे अनेकदा हात-पाय थरथरतात, डोके चालेनासे होते, प्रचंड आळस येतो. जेव्हा आपला मेंदू थकतो तेव्हा त्याचा परिणाम सरळ आपल्या शरीरावर येतो. याकडे दुर्लक्ष न करता वेळीच काळजी घेतल्यास ताण कमी होईल. (Natural Remedies for Stress)2 / 7जर आपल्याला सतत नैराश्य किंवा भीती वाटत असेल, तर महागड्या औषधांऐवजी किचनमधील ५ गोष्टी आपला मूड बदलण्यासाठी नक्कीच प्रभावी ठरतील. (Mood Boosting Foods)3 / 7आपल्याला जेव्हा खूप जास्त स्ट्रेस येतो किंवा हात-पाय लटपटतात तेव्हा डार्क चॉकलेटचा छोटासा तुकडा खा. यामुळे मेंदूतील एंडोर्फिन नावाचे हार्मोन स्त्रवते. यामुळे नैसर्गिकरित्या ताण कमी होतो आणि आपला मूड सुधारतो. 4 / 7केळ्यामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी ६ भरपूर प्रमाणात असते. यातील पोषक तत्वे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि मज्जासंस्थेला शांत करण्यास मदत करतात. आपल्याला आळस येत असेल तर १ केळी खा. 5 / 7बदाम आणि अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियम शरीरातील स्नायूंना आराम देण्याचे काम करते. ज्यामुळे आपले हात-पाय लटपटणे किंवा थरथर कमी होते. तसेच हे आपल्या मेंदूची एकाग्रता वाढवण्यासाठी उत्तम आहे. 6 / 7आपल्या पचनसंस्थेचा आणि मेंदूचा थेट संबंध असतो. दह्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारतात आणि शरीरातील जळजळ कमी करतात. रोज दुपारी दही खाल्ल्याने मन शांत राहते आणि चि़डचिड कमी होते. 7 / 7ग्रीन टीमध्ये एल- थेनाइन नावाचा घटक असतो. ज्यामुळे आपला स्ट्रेस कमी होऊन हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. यामुळे मेंदू रिलॅक्स होतो. उन्हाळ्याच्या दिवसात पुदिना आणि लिंबू घालून तयार केलेला हर्बल टी प्यायल्याने ताजेतवाने वाटते आणि मरगळ दूर होते.