Join us
Daily Top 2 Weekly Top 5

पैसा-प्रेम-प्रतिष्ठा हवी तर स्वत:ला लावा १० सवयी, यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2026 20:00 IST

1 / 12
आपण सगळेच आयुष्यात मोठं होण्याचं, नाव कमवण्याचं स्वप्न पाहतो. पण प्रश्न असा पडतो की, काही लोक खूप कमी वेळात यशाच्या शिखरावर कसे पोहोचतात. तर काही लोक दिवस-रात्र मेहनत करुनही तिथेच का राहतात? याचं उत्तर आहे आपल्या सवयी. आपल्या काही सवयी बदलल्या तर आपण आपले भविष्य देखील बदलू शकतो. (How to build self discipline marathi)
2 / 12
आपल्या जीवनात खरोखर यशस्वी व्हायचं असेल आणि अशी वेळ आणायची असेल जिथे यश आपल्या मागे येईल, तर स्वतःमध्ये काही महत्त्वाचे बदल करावे लागतील. या १० सवयी स्वत:ला लावल्यास आयुष्यात कधीही वाईट वेळ येणार नाही. (Mindset for success and happiness)
3 / 12
आपण सकाळी लवकर सूर्योदयापूर्वी उठायला हवे. इतरांपेक्षा २ ते ३ तास जास्त मिळतील.ज्यामध्ये आपण व्यायाम, वाचन किंवा नियोजनासारखी महत्त्वाची कामे करु शकतो.
4 / 12
वेळ कोणासाठीही थांबत नाही. रोजच्या कामाची आदल्या रात्रीच यादी करा. यामुळे आपला वेळ वाया जाणार नाही आणि महत्त्वाची कामे लवकर पूर्ण होतील.
5 / 12
शिक्षण फक्त पदवीपुरते मर्यादित नसते. रोज किमान २० ते ३० मिनिटे पुस्तके वाचण्याची किंवा नवीन गोष्ट शिकण्याची सवय लावा.
6 / 12
यश पाहण्यासाठी शरीर सदृढ असणं देखील महत्त्वाचं आहे. रोज व्यायाम आणि सकस आहार घेतल्याने आपली ऊर्जा पातळी वाढते. ज्यामुळे आपण कामावर लक्ष केंद्रित करु शकतो.
7 / 12
कमी बोला आणि जास्त ऐका. दुसऱ्यांचे ऐकल्याने आपल्याला नवीन दृष्टीकोन मिळतो, ज्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते.
8 / 12
आपल्याला नक्की काय साध्य करायचे आहे याचा विचार करा. त्या ध्येयापर्यंत कसं पोहोचता येईल याची आखणी करा.
9 / 12
फक्त पैसे कमावणे महत्त्वाचे नाही तर ते योग्य ठिकाणी गुंतवणे किंवा साठवणे देखील गरजेचे आहे. विनाकारण होणारा खर्च टाळून गुंतवणुकीची सवय लावल्यास कधीही आर्थिक संकट येणार नाही.
10 / 12
यशस्वी लोक अपयशाला शेवट मानत नाहीत, तर ती एक शिकण्याची संधी मानतात. आपली चूक कुठे झाली याचे विश्लेषण करून पुन्हा जोमाने प्रयत्न करणे हाच यशाचा मार्ग आहे.
11 / 12
आपल्या आजूबाजूला असलेल्या ५ लोकांसारखेच तुम्ही बनता. त्यामुळे नेहमी सकारात्मक, महत्त्वाकांक्षी आणि आपल्याला प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या संगतीत राहा.
12 / 12
तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे किंवा निसर्गाचे आभार मानण्याची सवय लावा. यामुळे आपले मन शांत राहते आणि नवीन आव्हाने पेलण्यासाठी मानसिक बळ मिळते.
टॅग्स : मानसिक आरोग्य