1 / 6भारतीय महिला क्रिकेटमध्येही उमा छेत्री या आसामी मुलीचं नाव गाजतं आहे. गोलाघाट जिल्ह्यातलं लहानसं कंदूलीगिरी गाव ते भारतीय संघ ही तिची गोष्ट तर विलक्षण जिद्दीची आहे.2 / 6भारतीय महिला क्रिकेट संघात खेळणारी उमा दुसरी खेळाडू, याआधी रितू ध्रूब भारतीय संघात खेळली होती. ती उत्तम विकेटकीपिंग करते. 3 / 6शेतकरी कुटुंबात वाढलेली उमा. आसाममध्ये क्रिकेटवेड नव्हतंच. मुलींनी खेळणं तर तसंही अवघड. पण उमाला क्रिकेट आवडायचं. लहान भावांसोबत ती गावात रस्त्यावर क्रिकेट खेळायची. तिच्या आईने तिला वयाच्या तिसऱ्या वर्षी एक प्लास्टिकचा बॅट घेऊन दिला, आणि तिथूनच तिच्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात झाली. लेकीच्या पाठीशी आई ठाम उमी राहिली.4 / 6आर्थिक अडचणी असूनही उमाने सातत्याने सराव केला. स्थानिक प्रशिक्षक राजा रहमान आणि महबूब आलम यांच्या मार्गदर्शनाखाली तिने उत्तम तयारी केली. भारतीय संघापर्यंत धडक मारली. 5 / 6विमेन प्रिमियर लिगही खेळली. २०२४ मध्ये भारताच्या महिला संघात स्थान मिळवणारी आसाम व ईशान्य भारतातील ती पहिली खेळाडू बनली. ७ जुलै २०२४ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिने टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. एशियन गेम्स २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होती.6 / 6उमा, आज ईशान्य भारतीय मुलींसाठीच नाही तर सर्वच मुलींसाठी आदर्श आहे. मेहनत आणि कष्ट यांच्या जोरावर एका गावातल्या मुलीनं ग्लोबल धडक मारली आहे.