Sridevi : चांदनी-नगिना ते चालबाज - श्रीदेवीचे हे ८ सिनेमे तुम्ही पाहिलेत का? 'हवाहवाई'च्या पडाल प्रेमात..

Updated:February 24, 2022 18:31 IST2022-02-24T18:10:00+5:302022-02-24T18:31:41+5:30

Sridevi Death anniversary : आपल्या प्रत्येक भूमिकेने मनाचा ठाव घेणारी श्रीदेवी हिचे अकाली निधन मलाना चटका लावून जाणारे होते, पण आजही ती प्रेक्षकांच्या मनात कायम आहे, पाहा तिच्या गाजलेल्या चित्रपटातील लूक

Sridevi : चांदनी-नगिना ते चालबाज - श्रीदेवीचे हे ८ सिनेमे तुम्ही पाहिलेत का? 'हवाहवाई'च्या पडाल प्रेमात..

श्रीदेवी म्हणजेच बॉलिवूडमधील ‘हवाहवाई’ किंवा अनेकांसाठीची ‘चांदनी’ ही ७० ते ८० च्या काळातील अनेकांच्या हृदयाचा ठाव घेणारी अभिनेत्री. आपल्या सुंदर रुपाने आणि उत्तम अभिनयाने श्रीदेवीने चित्रपटसृष्टी गाजवली. इतकेच नाही तर तिने केलेल्या असंख्य भूमिका आजही चित्रपटप्रेमींच्या मनात जशाच्या तशा आहेत. आज श्रीदेवीचा (Shridevi Death anniversary) मृत्यू होऊन ४ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने तिच्या गाजलेल्या भूमिकांचा आढावा घेऊया...

Sridevi : चांदनी-नगिना ते चालबाज - श्रीदेवीचे हे ८ सिनेमे तुम्ही पाहिलेत का? 'हवाहवाई'च्या पडाल प्रेमात..

नायिका म्हणून काम करत असताना श्रीदेवीने केवळ आपली भूमिका साकारली नाही तर त्या चित्रपटांना वेगळी ओळख दिली. ‘लम्हे’ हा तिचा अतिशय गाजलेला चित्रपट. यशराज बॅनरसोबत केलेल्या या चित्रपटासाठी श्रीदेवी हिला दुसऱ्यांदा फिल्मफेअर मिळाला होता. या चित्रपटानंतर श्रीदेवी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

Sridevi : चांदनी-नगिना ते चालबाज - श्रीदेवीचे हे ८ सिनेमे तुम्ही पाहिलेत का? 'हवाहवाई'च्या पडाल प्रेमात..

‘हिम्मतवाला’ हा श्रीदेवी हिचा ८० च्या दशकात गाजलेला आणखी एक चित्रपट. यातीच तिचे सौंदर्य आणि अदा पाहून प्रेक्षक घायाळ झाले होते. यातील श्रीदेवी यांच्‍यावर चित्रीत करण्‍यात आलेली गाणी 'नैनों में सपना', 'लडकी नहीं है', 'ताकी ओ ताकी' अनेक वर्षं गाजली.

Sridevi : चांदनी-नगिना ते चालबाज - श्रीदेवीचे हे ८ सिनेमे तुम्ही पाहिलेत का? 'हवाहवाई'च्या पडाल प्रेमात..

‘चांदनी’ हा श्रीदेवीच्या यशस्वी चित्रपटांपैकी एक महत्त्वाचा चित्रपट होता. यातील चांदनीची तिने केलेली भूमिका खूप गाजली आणि या चित्रपटाने श्रीदेवीला अभिनेत्री म्हणून नाव मिळवून दिले. तिच्या करीयरमध्ये हा चित्रपट मैलाचा दगड ठरला.

Sridevi : चांदनी-नगिना ते चालबाज - श्रीदेवीचे हे ८ सिनेमे तुम्ही पाहिलेत का? 'हवाहवाई'च्या पडाल प्रेमात..

१९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सदमा’ या चित्रपटात श्रीदेवी यांनी नेहालता मल्होत्राची भूमिका साकारली. या चित्रपटातील कमल हासन आणि श्रीदेवी याच्या जोडीला प्रेक्षकांनी बरीच पसंती दिली. तमिळ चित्रपट 'मूंदरम पिरई'चा रिमेक म्हणजे सदमा होता. 

Sridevi : चांदनी-नगिना ते चालबाज - श्रीदेवीचे हे ८ सिनेमे तुम्ही पाहिलेत का? 'हवाहवाई'च्या पडाल प्रेमात..

‘चालबाझ’ हा श्रीदेवीचा आणखी एक सुपरहिट झालेला सिनेमा लम्हेप्रमाणेच या चित्रपटातही श्रीदेवी यांनी डबल रोल केला होता. अंजू आणि मंजूच्या दुहेरी भुमिकेने श्रीदेवी यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

Sridevi : चांदनी-नगिना ते चालबाज - श्रीदेवीचे हे ८ सिनेमे तुम्ही पाहिलेत का? 'हवाहवाई'च्या पडाल प्रेमात..

अलिकडे प्रदर्शित झालेला ‘इंग्लिश-विंग्लिश’ हा श्रीदेवी यांचा आणखी एक महत्त्वाचा चित्रपट. अनेक वर्षांच्या विश्रांतीनंतर श्रीदेवी यांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक केले होते. य़ामध्ये इंग्रजी शिकण्याच्या प्रयत्नात असलेली गृहीणीची भूमिका त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने गाजवली होती.

Sridevi : चांदनी-नगिना ते चालबाज - श्रीदेवीचे हे ८ सिनेमे तुम्ही पाहिलेत का? 'हवाहवाई'च्या पडाल प्रेमात..

‘लाडला’ चित्रपटात श्रीदेवी गंभीर भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आल्या. रोमँटीक अभिनेत्री म्हणून आपली असणारी इमेज त्यांनी सदमा आणि लाडला या चित्रपचातून स्वत:च मोडली. अनिल कपूर आणि श्रीदेवी ही प्रसिद्ध जोडी त्यावेळी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरत होती.

Sridevi : चांदनी-नगिना ते चालबाज - श्रीदेवीचे हे ८ सिनेमे तुम्ही पाहिलेत का? 'हवाहवाई'च्या पडाल प्रेमात..

‘खुदा गवाह’ या चित्रपटात श्रीदेवी यांनी बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत नायिकेची भूमिका केली. अमिताभ यांच्यासमोर नायिका मागे पडतात असे म्हटले जात असताना नायिकेची दमदार भूमिका असेल तेव्हाचट मी बिग बींसोबत काम करेन असे श्रीदेवी म्हटल्या होत्या आणि या चित्रपटातून त्यांनी आपल्या भूमिकेद्वारे ते सिद्ध केले.

Sridevi : चांदनी-नगिना ते चालबाज - श्रीदेवीचे हे ८ सिनेमे तुम्ही पाहिलेत का? 'हवाहवाई'च्या पडाल प्रेमात..

अशी ही अतिशय हुशार आणि देखणी अभिनेत्री अचानक झालेल्या अपघातामुळे अवघ्या ५४ व्या वर्षी सोडून गेली. बॉलिवूडमध्ये अतिशय उत्तम कामगिरी करत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या श्रीदेवी हिच्या मृत्यूनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि त्यांचे चाहते यांनी मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली.