खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं

Updated:October 13, 2025 15:22 IST2025-10-13T15:16:17+5:302025-10-13T15:22:37+5:30

Simran Sharma : वर्ल्ड चॅम्पियन, पॅरालिम्पिक पदक विजेती आणि अर्जुन पुरस्कार विजेती सिमरनने आपल्या यशाचं श्रेय पती गजेंद्र सिंह याला दिलं आहे.

खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य करता येतात. अशीच एक यशोगाथा समोर आली आहे. एथलीट सिमरन शर्माने आपल्या देशाचं नाव उंचावलं आहे.

खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं

वर्ल्ड चॅम्पियन, पॅरालिम्पिक पदक विजेती आणि अर्जुन पुरस्कार विजेती सिमरनने आपल्या यशाचं श्रेय पती गजेंद्र सिंह याला दिलं आहे. भारतीय सैन्यात असलेल्या गजेंद्रने सिमरनला पाठिंब्यासोबतच ट्रेनिंगही दिलं आणि तिच्या कोचची भूमिकाही चोख बजावली.

खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं

सिमरन ही उत्तर प्रदेशातील मोदी नगरची रहिवासी आहे. सिमरनच्या कुटुंबाकडे सिमरनला ट्रेनिंग देण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. गजेंद्र सिंह आणि सिमरन शर्मा यांचा प्रेमविवाह झाला.

खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं

सिमरनची स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी, खेळात प्रगती करता यावी यासाठी पती गजेंद्रने शक्य तितके सर्व प्रयत्न केले. सिमरनने आपल्या पतीचे आभार मानले आणि भरभरून कौतुक केलं आहे.

खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं

"आयुष्यात असा एक काळ आला जेव्हा आमच्याकडचे पैसे संपले आणि गजेंद्रने त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा त्याग केला. त्याला ज्यूस पिण्याची खूप आवड होती. मला ज्यूस देण्यासाठी पैसे नसल्याने गजेंद्रने ज्यूस पिणं बंद केलं होतं."

खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं

"गजेंद्रला शूज आणि इतर अनेक गोष्टींचीही आवड होती, पण माझ्यामुळे त्याने सर्व काही सोडलं. त्याची जमीनही विकली" असं सिमरन शर्माने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं

"यश हे फक्त कठोर परिश्रमाने मिळत नाही, त्यासाठी एका खऱ्या जोडीदाराची देखील गरज असते. गजेंद्र, तुझ्या पाठिंब्यामुळेच मी कधीच खचली नाही. तू सोबत असताना प्रत्येक ध्येय शक्य आहे."

खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं

"लग्न झाल्यावर अनेक मुलींचं आयुष्य संपतं, पण माझं तेव्हाच सुरू झालं. माझ्या नवऱ्याने मला वर्ल्ड चॅम्पियन केलं" असं सिमरन शर्माने म्हटलं आहे. गजेंद्रने सिमरनसाठी आपलं सर्व सेव्हिंग खर्चं केलं, जमीन विकली.

खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं

असंख्य अडचणी आल्या पण सिमरन आणि गजेंद्रने हार मानली नाही, कष्ट करायची तयारी होती. सिमरनच्या स्वप्नांसाठी गजेंद्रने शक्य ते सर्व प्रयत्न केले. आज सर्वच जण दोघांचंही भरभरून कौतुक करत आहेत.

खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं

सुरुवातीला अपयश आलं पण सिमरन खचली नाही. पतीने तिला भक्कम साथ दिली. दोघांनी मिळून त्यांचं मोठं स्वप्न साकार केलं. सिमरनपासून आता लाखो तरुणांना प्रेरणा मिळत आहे.