Join us

कर्नल सोफिया कुरेशी आणि डॉ. शायना, जुळ्या बहिणींच्या देशप्रेमाची कर्तबगार धडाडीची गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2025 18:00 IST

1 / 7
ऑपरेशन सिंदूरचं प्रेस ब्रिफिंग कर्नल सोफिया कुरेशी सध्या चर्चेत (Meet Colonel Sofiya Quraishi's 'all-rounder' twin sister Shyna Sunsara) आहेत. त्यांची धिरोदात्त वाणी आणि अत्यंत संयमित वावर सगळ्यांच्या कौतुकाचा आणि आदराचा विषय आहे. त्यांच्या कुटुंबियांसाठीही ही अभिमानाची बाब आहे. विशेषत: त्यांची डॉ. शायना सनसारा यांना आपल्या बहिणीच्या कामगिरीचा अभिमानच आहे.
2 / 7
सोफिया आणि शायना जुळ्या बहिणी. दोघींनी (Meet Vadodara's ‘Wonder Woman’ Shyna Sunsara, twin sister of Colonel Sofiya Qureshi) स्वकर्तृत्वाने आपली ओळख निर्माण केली आहे. एकमेकींवर माया तर आहेच पण एकमेकींच्या कामाचा अभिमानही आहे. डॉ. शायना यांनी बहिणीला सैन्याच्या गणवेशात टीव्हीवर पाहून त्यांनी अभिमानाने दिलेल्या प्रतिक्रिया व्हायरल आहे.
3 / 7
कर्नल सोफिया कुरेशी आणि डॉक्टर शायना सनसारा यांचे वडील १९७१ च्या युद्धात लढले होते. आजोबाही स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. यामुळे दोघींना अगदी बालपणापासून घरातूनच देशभक्तीचा वारसा लाभला होता.
4 / 7
डॉक्टर शायना ही अर्थशास्त्रज्ञ, पर्यावरणवादी, फॅशन डिझायनर, माजी आर्मी कॅडेड, तसेच रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक विजेत्या आहेत.
5 / 7
MS. Gujarat, MS. India Earth २०१७, MS. United Nation २०१८ हे पुरस्कार शायना यांना मिळाले आहेत.
6 / 7
शायना यांना पर्यावरणाची आवड असून गुजरातमध्ये १ लाख झाडं लावण्याचा यशस्वी उपक्रम त्यांनी राबवला आहे.
7 / 7
अशी ही या जुळ्या बहिणींची गोष्ट, एकीने युनिफॉर्म घालून देशाचं नेतृत्व केलं. तर दुसरी आपल्या कामानं देशासेवा करत आहे.
टॅग्स : सोशल व्हायरलमहिलाप्रेरणादायक गोष्टी