Kranti Goud : छत्त्तरपूरच्या क्रांतीने केली किमया, खेड्यातली एक तरुणी झाली यशस्वी क्रिकेट स्टार
Updated:October 6, 2025 18:37 IST2025-10-06T18:33:39+5:302025-10-06T18:37:37+5:30
Kranti Goud: a young woman from the village became a successful cricket star : क्रांती गौंड ठरली नवी सुपरस्टार प्लेयर.

भारतीय महिला संघासाठी खेळणाऱ्या सगळ्याच महिला आपापल्यापरीने देशाला विजय मिळवून देण्यासाठी घाम गाळत आहेत. विविध सामन्यांमध्ये विजय मिळवून देशाचे नाव मोठे करत आहेत. यंदा अनेक नवे चेहेरे पाहायला मिळाले. त्यापैकीच एक म्हणजे क्रांती गौंड.
क्रांतीचे वय २२ वर्षे असून ती एक मिडियम फास्ट बॉलर आहे. ती मध्य प्रदेश मधील छत्तरपूर येथील घवरा येथील स्थायिक आहे. WPL मध्ये तिने UP Warriorz या संघातून तिचे नाव क्रिकेटविश्वात तयार केले.
घरची परिस्थिती तशी बेताचीच. ३ बहिणी आणि ३ भाई त्यातील क्रांती ६वी. म्हणजे घरचे शेंडे फळ. क्रांतीचे वडील पोलिसा दलात कामाला होते, मात्र काही कारणास्तव त्यांना जॉब गमवावा लागला. तरी क्रांतीला घरुन पाठिंबा मिळाला.
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात क्रांतीने ६ विकेट्स घेतल्या भारताला हातून निसणारी मॅच पुन्हा मिळवून दिली. क्रांती ODI मध्ये खेळणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक मानली जाते.
२०२५ महिला विश्वचषकात भारत - पाकिस्तान सारख्या किचकट सामन्यात तिने ३ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी तिला प्लेअर ऑफ द मॅच हा सन्मान मिळाला.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने लहान वयातच मध्य प्रदेशसाठी खेळायला सुरवात केली होती. क्रांती शाळेत असल्यापासूनच क्रिकेट खेळत आहे. करीयरची सुरवात क्रांतीने दणक्यात केली आहे. प्रत्येक सामन्यात तिने योगदान दिले आहे.