जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC

Updated:October 1, 2025 16:46 IST2025-10-01T16:21:02+5:302025-10-01T16:46:41+5:30

IPS Uday Krishna Reddy : उदय कृष्ण रेड्डी याने कॉन्स्टेबल ते आयपीएस अधिकारी असा प्रेरणादायी प्रवास केला आहे.

जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC

आंध्र प्रदेशातील एका सामान्य गावातील रहिवासी असलेल्या उदय कृष्ण रेड्डी याने कॉन्स्टेबल ते आयपीएस अधिकारी असा प्रेरणादायी प्रवास केला आहे. लहानपणी आई-वडील गमावले. वृद्ध आजीने भाजी विकून त्याला मोठं केलं.

जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC

IPS अधिकारी उदय कृष्ण रेड्डी यांचं आयुष्य संघर्षाने भरलेलं होतं. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी त्यांची आई गमावली. त्यानंतर वडीलही गमावले. या काळात त्यांच्या आजीने त्यांना वाढवलं. कुटुंबाची परिस्थिती चांगली नव्हती.

जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC

आजीने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भाज्या विकल्या. दहावीपर्यंत शिक्षण पुरेसं आहे असं आजीला वाटायचं पण तिने कधीही उदय यांना शिक्षण घेण्यापासून थांबवलं नाही. पूर्ण पाठिंबा दिला.

जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC

उदय यांना सुरुवातीला डॉक्टर व्हायचं होतं. त्यांनी मेडिकल लॅब टेक्निशियन होण्यासाठीही शिक्षण घेतलं, परंतु आर्थिक अडचणींमुळे त्यांना पुढे ते शक्य झालं नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही.

जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अभ्यास करत राहिले आणि सरकारी नोकरीची तयारी करत होते. त्यांची पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी निवड झाली. पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी चांगली होती, पण आदर मिळत नव्हता.

जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC

२०१३ ते २०१८ पर्यंत आंध्र प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून काम केलं. एका रिपोर्टमध्ये असं दिसून आलं आहे की, २०१८ मध्ये, एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून झालेल्या अपमानानंतर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला.

जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC

सर्कल इन्स्पेक्टर (सीआय) ने ६० सहकारी पोलीस अधिकाऱ्यांसमोर त्यांचा अपमान केला होता. या अपमानामुळे निराश होऊन त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निर्णय घेतला.

जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षांपैकी एक आहे. या अपमानामुळे दुःखी होऊन कठीण परीक्षेसाठी दिवसरात्र तयारी केली. कठोर मेहनत आणि अधिकारी बनण्याची आवड इतकी प्रबळ होती की त्यांनी दोनदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC

उदय कृष्ण रेड्डी यांनी २०२३ मध्ये त्यांची पहिली UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली, ७८० रँक मिळवला. पण ते पुरेसं नव्हतं. म्हणून, त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू ठेवली, पुन्हा परीक्षा दिली आणि पुन्हा उत्तीर्ण झाले. २

जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC

२०२४ मध्ये UPSC CSE परीक्षेत त्यांनी ३५० रँक मिळवला आणि त्यांना EWS श्रेणी अंतर्गत IPS केडरमध्ये स्थान मिळालं. त्यांच्यापासून आता अनेक तरुणांना मोठी प्रेरणा मिळत आहे.