ना निधी, ना सुविधा-अपमान झाले खूप, भारतीय महिला आइस हॉकी संघानं जिंकलं देशासाठी पहिलं पदक
Updated:June 11, 2025 14:54 IST2025-06-11T14:48:16+5:302025-06-11T14:54:28+5:30
Indian Womens Ice Hockey Team : सोयी सुविधांचा अभाव असतानाही भारतीय महिला आइस हॉकी संघाने इतिहास रचत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

भारतीय महिला आइस हॉकी संघाने २०२५ च्या युएई येथे झालेल्या आयआयएचएफ आशिया कपमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक जिंकलं. या स्पर्धेत पाच देशांनी सहभाग घेतला होता. भारताने पाच सामन्यांत सात गुणांसह स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले.
महिला आइस हॉकी आशियाई कपमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारताने एकूण पाच सामने खेळले. यापैकी तीन सामने जिंकले. तर दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.
सोयी सुविधांचा अभाव असतानाही भारतीय महिला आइस हॉकी संघाने इतिहास रचत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. भारताच्या विजयामुळे देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
लडाखच्या असह्य थंडीत भेगा पडलेल्या बर्फावर त्यांनी सराव केला. लोकांनी त्याची थट्टा केली गेली. याचा काहीच वापर नसल्याचं म्हटलं गेलं. पण मुलींनी हार मानली नाही, त्यांनी चिकाटी दाखवून मोठा विजय मिळवला.
भारतीय महिला आइस हॉकी संघाने कांस्यपदक मिळवून एक नवीन अध्याय लिहिला आहे, जो खेळाडुंची जिद्द आणि कठोर परिश्रम दाखवून देतो.
भारतीय महिला आइस हॉकी संघाचा लडाख आणि स्पिती व्हॅलीच्या खडकाळ पर्वतांपासून २०२५ IIHF महिला आशिया कपमध्ये पहिला कांस्यपदक जिंकण्याचा प्रवास उल्लेखनीय आहे.
३१ मे ते ६ जून दरम्यान अल-ऐन, UAE येथे झालेल्या स्पर्धेत, संघाने पाच सामन्यांमध्ये पाच देशांचा सामना केला—तीन विजय आणि दोन पराभवांसह तिसरं स्थान पटकावलं. लडाख आणि स्पीती येथील गोठलेल्या तलावांवरून हा प्रवास सुरू झाला, जिथे हिवाळ्यातील तापमान शून्यापेक्षा खूपच खाली जाते.
तरुणींचा एक दृढनिश्चयी गट आईस हॉकी खेळला. सामाजिक नियमांना आणि पुरुषांचे वर्चस्व असलेल्या खेळाला आव्हान दिलं. योग्य उपकरणं, निधी किंवा कोणाही आदर्श नसतानाही त्यांनी फक्त एक स्वप्न पाहिलं अन् साकार केलं.
सुरुवातीच्या काळात पुरुष खेळाडूंना उपकरणं आणि सामन्यांमध्ये प्राधान्य मिळाल्यानंतरच महिलांना रिंकमध्ये वेळ देण्यात आला. पुरुषांचे अयोग्य कपडे उधार घेण्यास भाग पाडले जात असल्याने, त्यांना सतत निराशेचा सामना करावा लागत होता .
"घरी जा आणि आई व्हा" किंवा "नृत्य शिकण्याचा प्रयत्न करा" असं सांगितलं जात होतं. तरीही, त्यांनी स्वतःची रिंक बांधली आणि त्यावर त्यांचंच स्वामित्व असल्याचं सिद्ध केलं.
ध्येय बळकट करण्यासाठी, खेळाडूंनी लडाख महिला आइस हॉकी फाउंडेशनची स्थापना केली. गेल्या दशकात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि दुर्गम गावांमध्ये तरुण खेळाडूंना प्रशिक्षण दिलं आहे.