Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक

Updated:October 13, 2025 16:53 IST2025-10-13T16:45:29+5:302025-10-13T16:53:26+5:30

Harshita Dave : इंदूरची रहिवासी असलेल्या हर्षिता दवेने अवघ्या २२ व्या वर्षी राज्यस्तरीय नागरी सेवा परीक्षा (PCS परीक्षा) उत्तीर्ण होऊन एक विक्रम रचला आहे.

Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक

सोशल मीडियाच्या युगात तरुणांमध्ये रील बनवण्याची क्रेझ सतत वाढत आहे. रीलच्या नादात अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. मात्र अशातच २२ वर्षीय हर्षिता दवेने हे म्हणणं चुकीचं असल्याचं दाखवून दिलं आहे.

Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक

हर्षिताने आपल्या मेहनतीने यश मिळवण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही हे सिद्ध केलं. इंदूरची रहिवासी असलेल्या हर्षिता दवेने अवघ्या २२ व्या वर्षी राज्यस्तरीय नागरी सेवा परीक्षा (PCS परीक्षा) उत्तीर्ण होऊन एक विक्रम रचला आहे.

Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक

मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (एमपीपीएससी) प्रांतीय नागरी सेवा परीक्षा २०२४ मध्ये फक्त उत्तीर्णच झाली नाही तर महिला वर्गातही अव्वल स्थान मिळवलं. एमपीपीएससी पीसीएस २०२४ परीक्षेत ऑल इंडिया ५ वा रँक मिळवला.

Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक

हर्षिता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर १०० हून अधिक पोस्ट आहेत आणि १९,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत. तिला रील्स तयार करायला आवडतात. ती अनेकदा फिल्मी डायलॉगची मिमिक्री करून सोशल मीडियावर शेअर करते.

Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक

हर्षिता शाळेतच एक उत्कृष्ट विद्यार्थिनी होती. तिने सरस्वती शिशु मंदिर आणि माधव विद्यापीठात शिक्षण घेतलं. तिने कला शाखेत ११ वी आणि १२ वी उत्तीर्ण केली. त्यानंतर तिने इतिहास, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र यासारख्या विषयांसह बॅचलर डिग्री मिळवली.

Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक

२०२३ मध्ये राज्यशास्त्रात एमए पूर्ण केलं. लहानपणापासूनच हर्षिताला रंगभूमीची आवड होती. आंतरराष्ट्रीय वादविवाद स्पर्धा असोत, भाषण देणं असोत किंवा अभिनय असोत, तिने प्रत्येक गोष्टीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक

हर्षिताला तिच्या आजीकडून नागरी सेवेत येण्याची प्रेरणा मिळाली. एका मुलाखतीत तिच्या आजीचा उल्लेख करताना तिने सांगितलं की, तिची आजी सुशीला दवे प्रशासकीय सेवेत सामील होऊ इच्छित होती.

Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक

आजीच्या अपूर्ण स्वप्नाने हर्षिताला प्रेरणा दिली आणि तिने तिच्या आजीचे स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय ठेवलं. भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या राज्य सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.

Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक

हर्षिताने दररोज १२ ते १४ तास अभ्यास केला, कोचिंग घेतलं आणि दररोज लक्ष्य निश्चित करून यश मिळवलं. हा तिचा दुसरा प्रयत्न होता. यापूर्वी तिने २०२३ मध्ये एमपीएससी परीक्षा दिली होती. त्यावेळी तिने प्रिलिम्स उत्तीर्ण केले पण मुख्य परीक्षा राहिली.

Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक

अपयशी ठरल्यानंतरही तिने हार मानली नाही आणि दुसऱ्या प्रयत्नाची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात तिने केवळ परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर महिला वर्गातही अव्वल स्थान मिळवलं. ती २२ व्या वर्षी डेप्युटी कलेक्टर होणार आहे.

Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक

हर्षिता शिक्षण, मूल्ये आणि संस्कृतीत खोलवर रुजलेल्या कुटुंबातून येते. तिचे वडील डॉ. विकास दवे साहित्य अकादमीचे संचालक आहेत आणि तिची आई सुनीता दवे एका खासगी शाळेत हिंदी शिक्षिका आहे. तिचा मोठा भाऊ हार्दिक दवे न्यूज अँकर आहे.