Join us   

Engineers day : कार्याला सलाम! 'या' आहेत जग बदलून टाकणाऱ्या ५ महिला इंजिनिअर; वाचा त्यांच्या प्रवासाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 3:26 PM

1 / 6
भारतरत्न डॉ. सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांचा आज जन्मदिन. आजचा दिवस ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. १८६१ मध्ये जन्मलेल्या विश्वेश्वरय्या यांना तब्बल १०१ वर्षांचे आयुष्य लाभले. १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांचे बंगलोरला निधन झाले. इंजिनिअरिंग क्षेत्रात सुरूवातीपासून महिलांचा वाढता सहभाग उल्लेखनीय आहे. आजवरचा इतिहास पाहता अनेक महिला इंजिनिअर इतिहासातील काही महान नवकल्पनांसाठी जबाबदार आहेत. आज अभियंता दिनानिमित्ता तुम्हाला काही महिला इंजिनिअर्सच्या प्रवासाबाबत सांगणार आहेत. या क्षेत्रात त्यांनी आपली मर्यादा ओलांडताना संकोच ठेवला नाही. हे यावरून लक्षात येईल.
2 / 6
पेट्रीसिया बाथ वैद्यकीय पेटंट मिळवणारी पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला डॉक्टर होती. तिने मोतीबिंदूचे उपचार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले. नेत्ररोगशास्त्रात अभ्यास पूर्ण करणारी ती पहिली आफ्रिकन अमेरिकन होती. (Image Credit- esilv.fr)
3 / 6
हेडी लामर एक अविश्वसनीय अभिनेत्री आणि एक हुशार महिला शोधक होती. तिने शत्रूच्या हेरांना माहितीचे संवेदनशील भाग ऐकू नये म्हणून सिग्नल एन्क्रिप्ट करण्याची पद्धत तयार केली. बराच काळ, तिला कोणीही इंजिनीअरिंगमध्ये कोणी गांभीर्याने घेतले नाही. WWII दरम्यान, तिने कमांड सिग्नलसाठी वेगवेगळ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीजवर उडी मारण्याचा मार्ग शोधला, जेणेकरून त्याची कॉपी करण्यापासून प्रतिबंध करता येईल.
4 / 6
अॅडा लव्हलेस ही अॅनालिटिकल इंजिनची क्षमता संगणकासारख्या यंत्रासाठी म्हणून ओळखणारी पहिली व्यक्ती आहे. 19 व्या शतकात जन्मलेली ही गणितज्ज्ञ मुळात संगणकाचा शोध लागण्याच्या १०० वर्ष आधी कंम्यूटर प्रोग्रामर म्हणून ओळखली गेली होती.
5 / 6
मारिसा मेयर सध्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यवसायिक महिलांपैकी एक आहे. समकालीन जगातील विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील सर्वात प्रसिद्ध महिलांपैकी एक आहे. गुगलमध्ये सामील होणारी पहिली महिला अभियंता आणि यार्चू फॉर्च्युन 500 कंपनीची पहिली महिला मुख्य कार्यकारी अधिकारी. मारिसा मेयर अनेक वर्ष गुगल फ्लॅगशिप प्रोग्राम आणि अॅप्समध्ये सहभागी होती. तिने गुगल होमपेज, जीमेल, क्रोम, गुगल Earth इत्यादीच्या डिझाईनमध्ये सहभाग घेतला. नंतर तिला 2012 मध्ये याहूच्या सीईओ पदाची ऑफर देण्यात आली.
6 / 6
एडिथ क्लार्क ही पहिली महिला अभियंता आहे. 1883 मध्ये जन्मलेल्या एडिथनं विद्युत गुणधर्मांचे ग्राफिंग करण्यासाठी क्लार्क कॅल्क्युलेटर तयार केले. तिने आपल्या पालकांकडून मिळालेला वारसा महाविद्यालयात गणिताचा अभ्यास करण्यासाठी वापरला. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर्सने तिला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक पेपर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पेपर पारितोषिक देऊन सन्मानित केले. त्यानंतर ती अमेरिकेतील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पहिली महिला प्राध्यापक बनली तेव्हा तिला यूटी ऑस्टिन येथे नियुक्त केले गेले.
टॅग्स : महिलाप्रेरणादायक गोष्टी