International Day of Women and Girls in Science 2026: विज्ञानातील भारतीय 'शक्ती'; अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या ५ थोर महिला शास्त्रज्ञ

Updated:February 11, 2026 15:38 IST2026-02-11T15:27:12+5:302026-02-11T15:38:00+5:30

भारताची मान अभिमानाने उंचावणाऱ्या ५ दिग्गज महिला शास्त्रज्ञांबद्दल जाणून घेऊया...

International Day of Women and Girls in Science 2026: विज्ञानातील भारतीय 'शक्ती'; अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या ५ थोर महिला शास्त्रज्ञ

विज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिला शास्त्रज्ञांचा भारताला मोठा वारसा लाभला आहे. गेल्या काही वर्षांत प्रगती होऊनही भारतातील विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आजही आव्हानं, अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या आव्हानांनंतरही अनेक प्रेरणादायी महिलांनी सर्व अडथळ्यांवर मात करून या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलं आहे.

International Day of Women and Girls in Science 2026: विज्ञानातील भारतीय 'शक्ती'; अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या ५ थोर महिला शास्त्रज्ञ

संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी ११ फेब्रुवारी रोजी The International Day of Women and Girls in Science साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश STEM क्षेत्रात महिलांना समान संधी उपलब्ध करून देणं हा आहे. भारताची मान अभिमानाने उंचावणाऱ्या ५ दिग्गज महिला शास्त्रज्ञांबद्दल जाणून घेऊया...

International Day of Women and Girls in Science 2026: विज्ञानातील भारतीय 'शक्ती'; अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या ५ थोर महिला शास्त्रज्ञ

प्रसिद्ध भारतीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ गगनदीप कांग यांनी २०१९ मध्ये 'रॉयल सोसायटी'च्या फेलो म्हणून निवडून येणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरून इतिहास रचला आहे.

International Day of Women and Girls in Science 2026: विज्ञानातील भारतीय 'शक्ती'; अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या ५ थोर महिला शास्त्रज्ञ

गगनदीप यांचा रिसर्च मुलांमधील व्हायरल इन्फेक्शन, विशेषतः रोटाव्हायरस लसींच्या चाचणीवर केंद्रित आहे. कांग यांनी ३०० हून अधिक शोधनिबंध लिहिले असून, २०१६ मध्ये त्यांना प्रतिष्ठित 'इन्फोसिस पुरस्कार' देऊन गौरवण्यात आलं आहे.

International Day of Women and Girls in Science 2026: विज्ञानातील भारतीय 'शक्ती'; अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या ५ थोर महिला शास्त्रज्ञ

'भारताची मिसाईल वुमन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेसी थॉमस यांनी भारताच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

International Day of Women and Girls in Science 2026: विज्ञानातील भारतीय 'शक्ती'; अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या ५ थोर महिला शास्त्रज्ञ

भारतातील क्षेपणास्त्र प्रकल्पाचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ आहेत. एरोस्पेस इंजिनिअरिंगमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 'एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यू'सह अनेक नामांकित संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत.

International Day of Women and Girls in Science 2026: विज्ञानातील भारतीय 'शक्ती'; अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या ५ थोर महिला शास्त्रज्ञ

आयआयटी बॉम्बेमधील प्राध्यापक सुनीता सरावगी या डेटाबेस आणि डेटा मायनिंगमधील संशोधनासाठी ओळखल्या जातात.

International Day of Women and Girls in Science 2026: विज्ञानातील भारतीय 'शक्ती'; अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या ५ थोर महिला शास्त्रज्ञ

मोठ्या डेटासेटमधून महत्त्वाची माहिती काढण्याच्या त्यांच्या तंत्रामुळे डेटा मॅनेजमेंट सिस्टममध्ये मोठी क्रांती झाली आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना २०१९ मध्ये अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान क्षेत्रातील 'इन्फोसिस पुरस्कार' मिळाला आहे.

International Day of Women and Girls in Science 2026: विज्ञानातील भारतीय 'शक्ती'; अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या ५ थोर महिला शास्त्रज्ञ

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) पर्यावरण विज्ञान विभागाच्या प्राध्यापक सुधा भट्टाचार्य यांनी 'मॉलिक्युलर पॅरासिटोलॉजी'मध्ये मोठं योगदान दिलं आहे.

International Day of Women and Girls in Science 2026: विज्ञानातील भारतीय 'शक्ती'; अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या ५ थोर महिला शास्त्रज्ञ

'एंटामोइबा हिस्टोलिटिका'वरील त्यांच्या संशोधनामुळे जनुक नियमन आणि परजीवी जीवशास्त्रात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यांच्या संशोधनामुळे परजीवी आजारांवर नवीन उपचार पद्धती शोधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

International Day of Women and Girls in Science 2026: विज्ञानातील भारतीय 'शक्ती'; अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या ५ थोर महिला शास्त्रज्ञ

भारतीय एरोस्पेस इंजिनिअर निगार शाजी १९८७ पासून इस्रोमध्ये (ISRO) कार्यरत आहेत. भारताची पहिली सौर मोहीम 'आदित्य-L1' च्या त्या प्रकल्प संचालक होत्या.

International Day of Women and Girls in Science 2026: विज्ञानातील भारतीय 'शक्ती'; अडथळ्यांची शर्यत पार करणाऱ्या ५ थोर महिला शास्त्रज्ञ

३५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 'रिसोर्ससॅट-२ए' सारख्या महत्त्वाच्या उपग्रहांच्या निर्मितीतही सह-प्रकल्प संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. भारताच्या अंतराळ मोहिमांमध्ये त्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे.