८ तासांपेक्षा जास्त बसणं स्मोकिंग इतकंच घातक; तरुणपणीच व्हाल म्हातारे, आजच सोडा 'या' ८ सवयी

Updated:March 31, 2026 15:26 IST2026-03-31T15:08:14+5:302026-03-31T15:26:24+5:30

दैनंदिन सवयी आपल्याला हळूहळू म्हातारपणाकडे ढकलत आहेत. या सवयींबद्दल जाणून घेऊया.

८ तासांपेक्षा जास्त बसणं स्मोकिंग इतकंच घातक; तरुणपणीच व्हाल म्हातारे, आजच सोडा 'या' ८ सवयी

आजकाल 'हेल्दी लाइफस्टाइल' फॉलो करणं हा एक ट्रेंड बनला आहे. अनेकजण जंक फूडपासून दूर राहत आहेत आणि फिट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान दैनंदिन सवयी आपल्याला हळूहळू म्हातारपणाकडे ढकलत आहेत. या सवयींबद्दल जाणून घेऊया.

८ तासांपेक्षा जास्त बसणं स्मोकिंग इतकंच घातक; तरुणपणीच व्हाल म्हातारे, आजच सोडा 'या' ८ सवयी

तासनतास एका जागी बसून राहणे. रिसर्चनुसार जे लोक दिवसातून ८ तासांपेक्षा जास्त वेळ बसून राहतात आणि कोणताही व्यायाम करत नाहीत, त्यांच्या मृत्यूचा धोका लठ्ठपणा किंवा धूम्रपानाइतकाच असतो.

८ तासांपेक्षा जास्त बसणं स्मोकिंग इतकंच घातक; तरुणपणीच व्हाल म्हातारे, आजच सोडा 'या' ८ सवयी

दररोज ६०-७५ मिनिटांची शारीरिक हालचाल हा धोका कमी करू शकते. जास्त वेळ बसल्यामुळे मेटाबॉलिझम मंदावतं आणि डीएनएचे 'टेलोमीअर्स' वेगाने लहान होतात, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होते.

८ तासांपेक्षा जास्त बसणं स्मोकिंग इतकंच घातक; तरुणपणीच व्हाल म्हातारे, आजच सोडा 'या' ८ सवयी

दुसरे मोठे कारण म्हणजे झोपेची कमतरता. जर तुम्हाला वाटत असेल की ५ तासांची झोप पुरेशी आहे, तर तुम्ही तुमच्या शरीराशी तडजोड करत आहात. 'नॅशनल हार्ट लंग्स अँड ब्लड इन्स्टिट्यूट'नुसार, वयानुसार झोपेची गरज वेगळी असते आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

८ तासांपेक्षा जास्त बसणं स्मोकिंग इतकंच घातक; तरुणपणीच व्हाल म्हातारे, आजच सोडा 'या' ८ सवयी

झोपेच्या वेळी शरीर स्वतःची दुरुस्ती करते, हार्मोन्स संतुलन राखतं आणि ऊर्जा पुन्हा साठवते़ं. झोप पूर्ण न झाल्यामुळे त्वचा, रोगप्रतिकारक शक्ती आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो.

८ तासांपेक्षा जास्त बसणं स्मोकिंग इतकंच घातक; तरुणपणीच व्हाल म्हातारे, आजच सोडा 'या' ८ सवयी

तिसरी सवय म्हणजे सतत तणावात राहणं. जेव्हा ताण दीर्घकाळ टिकतो, तेव्हा शरीरात 'कोर्टिसोल' हार्मोन वाढते, जे त्वचेचं नुकसान करतं आणि अकाली सुरकुत्या आणतं. याशिवाय याचा परिणाम हृदय, पचनसंस्था आणि मानसिक आरोग्यावरही होतो.

८ तासांपेक्षा जास्त बसणं स्मोकिंग इतकंच घातक; तरुणपणीच व्हाल म्हातारे, आजच सोडा 'या' ८ सवयी

चौथी समस्या म्हणजे प्रमाणाबाहेर स्क्रीनचा वापर. मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे झोपेचे चक्र बिघडते आणि 'ब्लू लाइट'मुळे त्वचेवरही वाईट परिणाम होतो.

८ तासांपेक्षा जास्त बसणं स्मोकिंग इतकंच घातक; तरुणपणीच व्हाल म्हातारे, आजच सोडा 'या' ८ सवयी

पाचवी सवय म्हणजे पाणी कमी पिणं. डिहायड्रेशनमुळे त्वचा निर्जीव दिसते आणि शरीराची अनेक महत्त्वाची कार्ये मंदावतात. पाणी शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते.

८ तासांपेक्षा जास्त बसणं स्मोकिंग इतकंच घातक; तरुणपणीच व्हाल म्हातारे, आजच सोडा 'या' ८ सवयी

सहावी सवय म्हणजे साखर आणि 'प्रक्रिया केलेल्या अन्नाचे' (Processed Food) अतिसेवन. जास्त साखर शरीरात 'ग्लायकेशन' प्रक्रिया वाढवते, ज्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होते.

८ तासांपेक्षा जास्त बसणं स्मोकिंग इतकंच घातक; तरुणपणीच व्हाल म्हातारे, आजच सोडा 'या' ८ सवयी

सातवी सवय म्हणजे 'स्ट्रेंथ ट्रेनिंग'कडे दुर्लक्ष करणं. वयानुसार स्नायू कमी होतात, जर व्यायाम केला नाही तर ही प्रक्रिया वेगाने घडते आणि शरीर कमकुवत होतं.

८ तासांपेक्षा जास्त बसणं स्मोकिंग इतकंच घातक; तरुणपणीच व्हाल म्हातारे, आजच सोडा 'या' ८ सवयी

आठवी आणि अत्यंत महत्त्वाची सवय म्हणजे सामाजिक संबंधांकडे दुर्लक्ष करणं. संशोधनात असं दिसून आलं आहे की, एकटेपणा आणि सामाजिक दुरावा अकाली मृत्यूचा धोका वाढवू शकतो.