९०% लोक चुकीच्या पद्धतीने टरबूज खातात, आहारतज्ज्ञ सांगतात गडबड! तुमचंही चुकत नाही ना..
Updated:April 1, 2025 14:46 IST2025-04-01T13:52:24+5:302025-04-01T14:46:56+5:30

बाजारात टरबूज दिसू लागले की उन्हाळ्याची जाणीव व्हायला लागते. उन्हाळ्याच्या ४ महिन्यांतच मिळणारं हे फळ अनेकांच्या आवडीचं.
उन्हाळ्याचा त्रास सुसह्य करण्यासाठी टरबूज खाणं अत्यंत फायदेशीरही मानलं जातं. पण ते खात असताना तुम्ही काही चुका तर करत नाही ना हे एकदा तपासून पाहा (wrong method of eating watermelon). कारण तज्ञांच्या मध्ये ९० टक्के लोक चुकीच्या पद्धतीने टरबूज खातात आणि त्यामुळे मग वेगवेगळे आजार होतात.(what is the correct method of eating watermelon?)
याविषयीची पोस्ट आहारतज्ज्ञ प्रियांशी भटनागर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये त्या सांगतात की कधीही उपाशीपोटी टरबूज खाऊ नका. कारण त्यात भरपूर प्रमाणात पाणी असतं. यामुळे मग गॅसेस होणे, ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.
जेवण झाल्यानंतर किंवा अगदी भरपेट नाश्ता केल्यानंतर लगेचच टरबूज खाणं टाळावं. कारण त्यामुळे पोट फुगल्यासारखं होऊ शकतं. त्यामुळेच जेवण झाल्यानंतर कमीत कमी एखाद्या तासाने टरबूज खायला हवं.
फ्रिजमधून बाहेर काढलेलं टरबूज लगेच खाऊ नका. यामुळे सर्दी, शिंका येणे असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे टरबुजाला आधी थोडं सामान्य तापमानावर येऊ द्या आणि त्यानंतरच ते खा.
टरबुजावर मीठ टाकून खाण्याची सवय अनेकांना असते. पण हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण यामुळे शरीरातले सोडियमचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोकाही असतो.