डॉ. श्रीराम नेनेंचा सल्ला, हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर करा ५ गोष्टी -सर्दी खोकला होणार नाही

Updated:December 20, 2024 13:32 IST2024-12-20T12:49:47+5:302024-12-20T13:32:21+5:30

डॉ. श्रीराम नेनेंचा सल्ला, हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर करा ५ गोष्टी -सर्दी खोकला होणार नाही

हिवाळ्यात सर्दी, खोकला, छातीत कफ होणे, ताप येणे असा त्रास बऱ्याच लोकांना होतो (winter care tips by Dr Shriram Nene). जवळपास प्रत्येक घरात अशी एखादी तरी व्यक्ती असतेच (how to keep ourself safe in winter?). लहान मुलांना तर या आजारांचं इन्फेक्शन खूपच लवकर होतं.(how to avoid cold and cough in winter?)

डॉ. श्रीराम नेनेंचा सल्ला, हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर करा ५ गोष्टी -सर्दी खोकला होणार नाही

त्यामुळे हे सगळे आजार टाळायचे असतील तर हिवाळ्यात स्वत:ची कशी काळजी घ्यावी, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला असून यामध्ये त्यांनी काही गोष्टी कटाक्षाने करायला सांगितल्या आहेत. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा..

डॉ. श्रीराम नेनेंचा सल्ला, हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर करा ५ गोष्टी -सर्दी खोकला होणार नाही

डॉ. नेनेंनी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे थंडीमध्ये कधीही घराबाहेर पडायची वेळ आलीच तर तुमचं डोकं रुमाल, टोपी, स्कार्फने पुर्णपणे झाकून घ्या. कारण डोक्याला गार वारा लागला तर आजारी पडण्याची शक्यता खूप जास्त असते.

डॉ. श्रीराम नेनेंचा सल्ला, हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर करा ५ गोष्टी -सर्दी खोकला होणार नाही

दुसरी गोष्ट म्हणजे हिवाळ्यात एकावर एक कपडे घालून तुमचं अंग व्यवस्थित झाकून घ्या. लहान मुलांच्या बाबतीत ही गोष्ट कटाक्षाने करायला हवी. कारण लहान मुलं बऱ्याचदा स्वेटर घालायला नकार देतात. अशावेळी त्यांना एकावर एक दोन तीन पुर्ण बाह्यांचे शर्ट घालायला हवे. हे कपडे व्यवस्थित घट्ट असावे. कारण सैलसर कपड्यांमधून हवा आत जाते.

डॉ. श्रीराम नेनेंचा सल्ला, हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर करा ५ गोष्टी -सर्दी खोकला होणार नाही

तिसरी गोष्ट म्हणजे पाणी योग्य प्रमाणात पिऊन शरीर व्यवस्थित हायड्रेटेड ठेवा. कारण शरीरात पाणी कमी असेल तर त्वचा कोरडी होते शिवाय अंगातली उर्जाही कमी होते.

डॉ. श्रीराम नेनेंचा सल्ला, हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर करा ५ गोष्टी -सर्दी खोकला होणार नाही

थंडीच्या दिवसांत काही जणांचे हातापायाचे बोटं गोठून गेल्यासारखे होतात. अशा लोकांनी घराबाहेर पडताना आठवणीने ग्लोव्ह्ज घालायला हवे.

डॉ. श्रीराम नेनेंचा सल्ला, हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर करा ५ गोष्टी -सर्दी खोकला होणार नाही

थंडी वाजते म्हणून खूप गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे. कारण आंघोळीचं पाणी अतिशय गरम असेल तर त्वचेवर तर त्याचा परिणाम होतोच, पण शरीरालाही वेगवेगळ्या तापमानासोबत जुळवून घ्यायला वेळ लागतो.