धनत्रयोदशीला धने आणि गुळाच्या नैवेद्याचं एवढं महत्त्व का? ५ कारणं- हा प्रसाद खायला विसरू नका

Updated:October 17, 2025 16:09 IST2025-10-17T16:01:18+5:302025-10-17T16:09:37+5:30

धनत्रयोदशीला धने आणि गुळाच्या नैवेद्याचं एवढं महत्त्व का? ५ कारणं- हा प्रसाद खायला विसरू नका

धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची, लक्ष्मीची आणि कुबेराची पूजा केली जाते आणि त्यांना धने आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. आपल्याकडे कोणताही सण असला तरी त्या सणाच्या नैवेद्याचे खूप महत्त्व असते. कारण त्याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी जोडलेला आहे.

धनत्रयोदशीला धने आणि गुळाच्या नैवेद्याचं एवढं महत्त्व का? ५ कारणं- हा प्रसाद खायला विसरू नका

आता धनत्रयोदशीच्या दिवशीही जो धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो तो देखील आयुर्वेदानुसार आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानला जातो. धने आणि गूळ खाल्ल्याने शरीरास नेमके कोणते लाभ होतात याची माहिती डाॅक्टरांनी dr.nehakarandikarjoshi या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

धनत्रयोदशीला धने आणि गुळाच्या नैवेद्याचं एवढं महत्त्व का? ५ कारणं- हा प्रसाद खायला विसरू नका

त्या सांगतात की मुत्रमार्गाचे कित्येक विकार कमी होण्यासाठी तसेच अंगातली उष्णता कमी करण्यासाठी धने खूप उपयुक्त ठरतात.

धनत्रयोदशीला धने आणि गुळाच्या नैवेद्याचं एवढं महत्त्व का? ५ कारणं- हा प्रसाद खायला विसरू नका

कित्येक महिलांना अंगावरून पांढरं पाणी जाण्याचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठीही धने गुणकारी ठरतात.

धनत्रयोदशीला धने आणि गुळाच्या नैवेद्याचं एवढं महत्त्व का? ५ कारणं- हा प्रसाद खायला विसरू नका

पचनक्रिया अधिक चांगली करून कॉन्स्टीपेशन, ॲसिडीटी, त्वचारोग असे त्रास कमी होण्यासही धने उपयुक्त आहेत.

धनत्रयोदशीला धने आणि गुळाच्या नैवेद्याचं एवढं महत्त्व का? ५ कारणं- हा प्रसाद खायला विसरू नका

गूळ हा रक्तशुद्धी करणारा तसेच उर्जा देणारा आहे. याशिवायही गुळाचे कित्येक फायदे आहेतच.

धनत्रयोदशीला धने आणि गुळाच्या नैवेद्याचं एवढं महत्त्व का? ५ कारणं- हा प्रसाद खायला विसरू नका

जेव्हा गूळ आणि धने हे दोन्ही एकत्र करून खाल्ले जातात तेव्हा ते आपल्या शरीराचे श्रम कमी करून शरीराला आराम देण्यासाठी मदत करतात. म्हणूनच दिवाळीच्या आधी झालेली दगदग, धावपळ यामुळे शरीराला आलेला थकवा घालवायचा असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी धने आणि गुळाचा नैवेद्य खायलाच हवा.