Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उन्हाळ्यात ताक 'अमृत' पण 'या' ५ प्रकारच्या लोकांनी चुकूनही पिऊ नये ताक, आजार शरीर पोखरतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2026 10:53 IST

1 / 7
उन्हाळा सुरु झाला की अंगाची लाहीलाही होते, शरीर थंड करण्यासाठी आपण नैसर्गिक पेयांचा आधार घेतो. अशावेळी ताक हे अनेकांचे आवडते पेय आहे. ताकाला आयुर्वेदामध्ये अमृत मानले जाते. हे आपले पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरते. दुपारच्या जेवणानंतर अनेकांना ताक पिण्याची सवय असते. ताकात असणारे प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स आरोग्यासाठी वरदान आहेत. पण ताक पिण्याचेही काही नियम आहेत. (Best time to drink buttermilk according to Ayurveda)
2 / 7
उन्हाळ्यात आपण दिवसभरात भरपूर ताक पितो. पण यावेळी आपण शरीरातील काही विशिष्ट समस्यांकडे दुर्लक्ष करतो. जर आपण चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने ताक प्यायल्यास आरोग्याला नुकसान होऊ शकते. इतकेच नाही तर या ५ लोकांनी ताक जरा जपूनच प्यावे, पाहूया त्यांच्याविषयी. (Buttermilk and skin allergy connection)
3 / 7
ज्यांना सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा संधिवाताचा त्रास आहे, त्यांनी ताक पिताना अत्यंत काळजी घ्यावी. ताक थंड आणि आंबट असते. यामुळे सांध्यांमधील जळजळ वाढू शकते, ज्यामुळे वेदना अधिक तीव्र होतात. रात्रीच्या वेळी ताक पिणे टाळा.
4 / 7
आपल्याला सतत सर्दी, खोकला, सायनस, दमा यांसारखे श्वसनाचे विकार असतील तर ताक आपल्यासाठी घातक ठरु शकते. ताकाची प्रकृती थंड असल्यामुळे कफ वाढवण्याचे काम करते. फ्रीजमधील थंड ताक प्यायल्याने छातीत कफ साचतो, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
5 / 7
ताकामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ज्यांना किडनी स्टोन किंवा किडनी संबंधित इतर गंभीर आजार आहेत. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ताक पिऊ नये. ताकातील पोषक तत्वे किडनीवर अतिरिक्त ताण देतात.
6 / 7
ज्यांना एक्झिमा, सोरायसिस किंवा त्वचेवर सतत खाज येण्याची समस्या आहे. त्यांच्यासाठी ताकातील आंबटपणा खाज वाढवू शकतो. आंबट पदार्थांमुळे रक्तातील उष्णता वाढून त्वचेचे रॅशेस अधिक लाल होतात. त्यामुळे ताक न प्यायलेलं बरं..
7 / 7
आपल्याला ताप किंवा इतर संसर्ग झाला असल्याने ताक पिणे टाळावे. ताप असताना शरीराची पचनशक्ती कमकुवत होते. अशावेळी ताक प्यायल्याने पचायला थोडे जड जाऊ शकते. तसेच शरीराचे तापमान संतुलित राखण्यास अडथळा येऊ शकतो.
टॅग्स : आरोग्यसमर स्पेशल