डायबिटीस, ब्लडप्रेशर, हृदयरोग असेल तर कोणती डाळ खावी? कोणत्या आजारात कोणती डाळ ठरते असरदार पाहा...
Updated:December 26, 2025 18:09 IST2025-12-26T17:49:24+5:302025-12-26T18:09:43+5:30
which dal should be eaten in which diseases : best dal for different health problems : which dal is good for which disease : वेगवेगळ्या शारीरिक समस्यांमध्ये किंवा आजारांमध्ये विशिष्ट डाळ खाणं एखाद्या औषधाप्रमाणेच काम करू शकते.

भारतात डाळ - भात हे फक्त अन्नपदार्थ नसून तो आपल्या रोजच्या आहाराचा अविभाज्य (which dal should be eaten in which diseases) भाग आहे. प्रत्येक घरात दररोज वेगवेगळ्या डाळी तयार केल्या जातात, ज्या फक्त चवीलाच चविष्ट नसून पोषक तत्वांचा खजिना असतात. शाकाहारी असणाऱ्यांसाठी तर डाळी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत. प्रोटीन, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेल्या डाळी केवळ पोट भरण्यासाठीच नव्हे, तर अनेक शारीरिक समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणूनही काम करतात.
प्रत्येक डाळीतील गुणधर्म, रंग, चव, टेक्शचर आणि त्यातील पोषक घटक (best dal for different health problems) वेगवेगळे असतात. त्यामुळेच, वेगवेगळ्या शारीरिक समस्यांमध्ये किंवा आजारांमध्ये विशिष्ट डाळ खाणं एखाद्या औषधाप्रमाणेच काम करू शकते. योग्य डाळीची निवड तुमची रोगप्रतिकारशक्ती तर वाढवतेच, पण आजाराच्या लक्षणांपासून लवकर आराम मिळवून देण्यासही मदत करते.
आपल्या आरोग्याच्या स्थितीनुसार कोणत्या आजारात किंवा कोणती शारीरिक समस्या असल्यास कोणती डाळ खाणे सर्वात जास्त फायदेशीर ठरेल, ते पाहा...
१. मधुमेह :-
जर आपल्याला मधुमेहाचा त्रास असेल, तर रोजच्या आहारात हरभरा डाळ (चना डाळ), मुगाची डाळ आणि मसूर डाळ यांचा समावेश अधिक प्रमाणात करावा. या डाळींचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' कमी असतो, त्यामुळे या डाळी खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) एकदम वेगाने वाढत नाही. या तिन्ही डाळी प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत आहेत, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि भूकही नियंत्रित राहते. मधुमेहाच्या रुग्णांनी तूर डाळ कमी प्रमाणांत खावी, कारण ती इतर डाळींच्या तुलनेने साखरेवर वेगळा परिणाम करू शकते.
२. ब्लड प्रेशर :-
जर आपले ब्लड प्रेशर कायमच हाय असेल तर, तर आहारात मीठ आणि तेल, तुपाचे प्रमाण कमी असावे. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी मसूर आणि मुगाची डाळ अधिक प्रमाणांत खावी. या डाळी पचायला अत्यंत हलक्या असतात आणि शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. या डाळी प्रथिने आणि फायबरयुक्त असतात. फायबरमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. जेव्हा कोलेस्ट्रॉल कमी होते, तेव्हा रक्तवाहिन्यांवरील दाब कमी होतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
३. हृदयविकार :-
ज्या लोकांना हृदयाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी आपल्या आहारात चणा डाळ आणि मसूर डाळ यांचा समावेश करावा. हृदयविकार असल्यास तेलकट, तळलेले, जास्त मसालेदार आणि पचायला जड पदार्थ कमी प्रमाणांत खाणे गरजेचे असते. चणा आणि मसूर डाळीतील पोषक घटक हृदय सुदृढ राखण्यास मदत करतात.
४. पचनशक्तीच्या समस्या :-
जर तुम्हाला वारंवार पोटाचे विकार किंवा पचनशक्तीशी संबंधित समस्या सतावत असतील, तर मुगाची डाळ हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. मुगाची डाळ पचायला अतिशय हलकी असते, त्यामुळे पोटावर ताण येत नाही. मुगाच्या डाळीत फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते.
५. पोटाच्या समस्यांसाठी :-
जर तुम्हाला वारंवार पोटदुखी, गॅस किंवा मंद पचनशक्तीचा त्रास होत असेल, तर मुगाची डाळ अत्यंत फायदेशीर ठरते. ही डाळ पचनक्रिया वेगवान करण्यास आणि पोटाला आराम देण्यास मदत करते.
६. थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्यास :-
जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा शरीरात शक्ती कमी वाटत असेल, तर आहारात तूर डाळ आणि उडीद डाळ यांचा समावेश करावा. या दोन्ही डाळी प्रथिने, फायबर, लोह आणि कॅल्शियम यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. या डाळीं खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते, ज्यामुळे ॲनिमियासारख्या समस्या दूर होतात. यात मुबलक प्रमाणात कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होतात, तर फायबरमुळे पोट साफ राहण्यास मदत मिळते.
७. डाळ खाण्याची योग्य पद्धत (How to Consume Dal) :-
सामान्यतः भारतात बहुतेक घरांमध्ये डाळीला विविध मसाल्यांची फोडणी देऊन खाणे पसंत केले जाते. परंतु, डाळ खाण्याची ही पद्धत आरोग्यासाठी योग्य नाही. डाळीला भरपूर मसाल्यांसोबत फोडणी देण्याची सवय चुकीची आहे, कारण यामुळे डाळीतील नैसर्गिक गुणधर्म कमी होऊ शकतात. डाळ नेहमी कमी मसाल्यांचा वापर करून, मंद आचेवर उकळून शिजवावी. यामुळे त्यातील सर्व पोषक तत्वे टिकून राहतात. डाळ शिजवताना त्यात फक्त मीठ, हळद आणि टोमॅटो टाकून शिजवणे उत्तम असते. जर तुम्हाला फोडणी द्यायचीच असेल, तर त्यासाठी अगदी कमी तेल, जिरे, हिंग आणि लसूण यांचा वापर करा. यामुळे डाळीची चवही वाढते आणि पचायलाही सोपी जाते.