तेलकट पदार्थ किंवा जंकफूड खाल्ल्यानंतर लगेचच खा 'हे' ७ पदार्थ, अपचन-ॲसिडिटी होणार नाही...
Updated:November 26, 2024 15:36 IST2024-11-26T15:11:58+5:302024-11-26T15:36:15+5:30
What To Eat After Eating Junk Food & Spicy Food To Avoid Acidity & Indigestion : काहीवेळा आपण खूप तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खातो असे पदार्थ खाऊन त्रास होऊ नये म्हणून, खावेत असे खास पदार्थ...

आजकाल आपण सतत वेगवेगळ्या प्रकारचे जंकफूड खात असतो. कितीही टाळलं तरी जंकफूड खाण्याचा, तेलकट- मसालेदार पदार्थ खाण्याचा मोह होतोच. असे पदार्थ खाल्ले की मग बऱ्याच जणांना ॲसिडीटी- अपचनाचा त्रास होतो. असा त्रास होऊ नये म्हणून जंकफूड किंवा इतर तेलकट- तुपकट मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर नेमके कोणते पदार्थ खावेत, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी Fiteloapp या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. ते पदार्थ नेमके कोणते आणि ते कोणत्या पदार्थांनंतर खावेत, ते पाहा...
१. मसालेदार, चमचमीत बिर्याणी खाल्ल्यावर एक ग्लास ताक प्यावे.
२. इंस्टंट नूडल्स खाल्ल्यानंतर एक सफरचंद किंवा काकडी या दोघांपैकी काहीतरी एक आवर्जून खा.
३. अगदी तिखट, मसालेदार पदार्थ खाल्ले असतील तर त्यानंतर केळं खा. यामुळे तिखट, मसाल्याचे पदार्थ पचण्यास अधिक मदत होते. आपण पेर किंवा संत्री- मोसंबी देखील खाऊ शकता.
४. तळलेले तेलकट - तुपकट पदार्थ खाल्ल्यावर हर्बल टी नक्की प्यावी.
५. वेफर्स सारखे तेलकट आणि खारट स्नॅक्स खाल्ल्यावर कलिंगड खावे.
६. बार्बेक्यू फूड खाल्लं असेल तर त्यानंतर एक केळ आवर्जून खा.
७. तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर सेलेरी ज्यूस प्यावा.
८. हे पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्ही खाल्लेल्या जंकफूडमधील किंवा तेलकट- तुपकट पदार्थांमधील अतिरिक्त शुगर शरीराबाहेर पडण्यास मदत होते.