उन्हात किती वाजता बसल्यानं व्हिटामीन-D जास्तीत जास्त मिळतं? पाहा उन्हात बसण्याची योग्य वेळ

Updated:November 19, 2025 15:54 IST2025-11-19T15:18:22+5:302025-11-19T15:54:21+5:30

What Time Is Best To Take Vitamin D From Sunlight : उन्हात जाताना सनसस्क्रीन लावूनच बाहेर पडा

उन्हात किती वाजता बसल्यानं व्हिटामीन-D जास्तीत जास्त मिळतं? पाहा उन्हात बसण्याची योग्य वेळ

व्हिटामीन डी ला 'सनशाईन व्हिटामीन' असं म्हटलं जातं. कारण सुर्याच्या किरणांपासून हे व्हिटामीन मिळते आणि व्हिटामीन डी चा प्रभावी स्त्रोत सुर्याची किरणं आहेत. थंडीच्या दिवसांत व्हिटामीन डी ची कमतरता दिसून येते, याची अनेक कारणं असू शकतात. (What Time Is Best To Take Vitamin D From Sunlight)

उन्हात किती वाजता बसल्यानं व्हिटामीन-D जास्तीत जास्त मिळतं? पाहा उन्हात बसण्याची योग्य वेळ

वातावरणात प्रदूषण असल्यामुळे सुर्याची किरणं जमिनीपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाहीत. याशिवाय हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण अधिक गरम कपडे परीधान करतो. ज्यामुळे त्वचेचा उन्हाशी असलेला संपर्क कमी होतो. (How To Boost Vitamin D In Body Naturally)

उन्हात किती वाजता बसल्यानं व्हिटामीन-D जास्तीत जास्त मिळतं? पाहा उन्हात बसण्याची योग्य वेळ

व्हिटामीन डी शरीरासाठी बरेच फायदेशीर ठरते. खासकरून हाडांच्या मजबूतीसाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.उन्हापासून व्हिटामीन डी मिळवण्यासाठी उन्हात नेमकं कोणत्यावेळी बसावं असा प्रश्न अनेकांना पडतो. व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी उन्हात नेमकं कधी बसावं ते समजून घेऊ.

उन्हात किती वाजता बसल्यानं व्हिटामीन-D जास्तीत जास्त मिळतं? पाहा उन्हात बसण्याची योग्य वेळ

एका अभ्यासानुसार आपल्या शरीरात व्हिटामीन डी तेव्हा बनते जेव्हा तीव्र सुर्य प्रकाश असतो. सकाळी १० ते दुपारी २ ही वेळ तीव्र उन्हाची असते. पण व्हिटामीन डी मिळवण्यासाठी तासनतास उन्हात बसणं योग्य नाहीत. तुम्ही २० ते ३० मिनिटं उन्हात थांबू शकता.

उन्हात किती वाजता बसल्यानं व्हिटामीन-D जास्तीत जास्त मिळतं? पाहा उन्हात बसण्याची योग्य वेळ

कधीही उन्हात जाताना सनसस्क्रीन लावूनच बाहेर पडा. आहारात पौष्टीक पदार्थांचा समावेश करा तसंच संतुलित आहारसुद्धा घेऊ शकता. अनेक डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ सकाळची वेळ अधिक सुरक्षित असल्याचं सुचवतात. कारण या वेळेत युव्ही बी किरणं मध्यम स्वरूपात उपलब्ध असतात आणि उष्णता कमी असल्यानं त्वचेला नुकसान होण्याची शक्यता कमी असते.

उन्हात किती वाजता बसल्यानं व्हिटामीन-D जास्तीत जास्त मिळतं? पाहा उन्हात बसण्याची योग्य वेळ

अनेक डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ सकाळची ८ ते १० ही वेळ अधिक सुरक्षित म्हणून सुचवतात. कारण या वेळेस यूव्ही-बी किरणे मध्यम स्वरूपात उपलब्ध असतात आणि उष्णता कमी असल्याने त्वचेला नुकसान होण्याची शक्यता कमी असते. या वेळेत तुम्ही २० ते ३० मिनिटं उन्हात बसू शकता.व्हिटामिन डी मिळवण्यासाटी थेट सुर्यप्रकाश आवश्यक आहे.

उन्हात किती वाजता बसल्यानं व्हिटामीन-D जास्तीत जास्त मिळतं? पाहा उन्हात बसण्याची योग्य वेळ

खिडकीच्या काचेतून किंवा गाडीच्या काचेतून आलेल्या सुर्यप्रकाश युव्ही बी-किरणं फिल्टर करतो त्यामुळे शरीरात व्हिटामीन डी तयार होत नाही. व्हिटामीन डी च्या निर्मितीसाठी चेहरा, हात, पाय थेट सुर्यप्रकाशात असावेत. तुमच्या त्वचेचा रंग आणि भौगोलिक स्थिती यावरही व्हिटामीन डी मिळण्याची प्रक्रिया अवलंबून असते.