मॉर्निंग वॉकला तर जाता पण चुकीच्या पद्धतीने चालणं म्हणजे हार्ट ॲटॅकचा धोका, टाळा ७ चुका...
Updated:August 13, 2025 14:55 IST2025-08-13T14:38:38+5:302025-08-13T14:55:13+5:30
Walking Mistakes Which Can Damage Heart : Walking Mistakes Which Can Damage Heart : Common Walking Mistakes : Heart Health Walking Tips : वॉकिंग करताना नकळतपणे काही अशा चुका करतो, ज्या हृदयासाठी हानिकारक ठरू शकतात. त्या कोणत्या ते पाहा...

वॉकिंग करणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. वजन कमी करण्यासाठी, हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी, मानसिक आरोग्य आणि ऊर्जा वाढवण्यासाठी वॉकिंग (Walking Mistakes Which Can Damage Heart) फायदेशीर ठरते. परंतु, चालताना नकळतपणे आपण काही चुका (Walking Mistakes) करतो ज्यामुळे हृदयाला हानी पोहोचू शकते.
अनेकदा आपण नकळतपणे काही अशा चुका करतो, ज्या हृदयासाठी हानिकारक (Walking Mistakes Which Damage Heart) ठरू शकतात. आपण वॉकिंग (Walking Mistakes Which Can Damage Heart) करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात ते पाहूयात...
चूक १ :- फार जलद किंवा फार हळू चालणे :-
वॉकिंग करताना चालण्याचा वेग हा योग्य असणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही खूप जलद गतीने चालत असाल, तर त्यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके अचानकपणे वाढू शकतात, जे हृदयासाठी धोकादायक ठरू शकते, विशेषत: ज्यांना आधीपासूनच हृदयासंबंधी समस्या आहेत त्यांच्यासाठी अतिशय जलद गतीने चालणे हानिकारक ठरु शकते. तसेच, जर तुम्ही खूप हळू चालत असाल, तर त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना योग्य ताकद मिळत नाही.
चूक २ :- वॉकिंग करताना चुकीचे पोश्चर असणे :-
वॉकिंग करताना शरीराचे पोश्चर योग्य नसेल, तर त्याचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही वाकून किंवा चुकीच्या पद्धतीने चालत असाल, तर त्यामुळे श्वास घेण्यात अडचण येऊ शकते आणि फुफ्फुसांपर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. अशावेळी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे सरळ उभे राहून, खांदे रिलॅक्स ठेवून आणि समोर पाहत चालणे आवश्यक असते.
चूक ३ :- वॉक करण्यापूर्वी वॉर्म-अप न करणे :-
अचानक जलद गतीने चालायला सुरुवात केल्याने हृदयाचे ठोके पटकन वाढू शकतात, ज्यामुळे हृदयावर जास्त ताण येतो. यापासून बचाव करण्यासाठी चालण्यापूर्वी ५ ते १० मिनिटे हलके वॉर्म-अप एक्सरसाइज नक्की करा, जसे की स्ट्रेचिंग किंवा हळूहळू चालणे. यामुळे शरीर आणि हृदय दोन्ही एक्सरसाइज करण्यासाठी तयार होतात.
चूक ४ :- डिहायड्रेट होऊन चालणे :-
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास रक्तदाबावर परिणाम होतो आणि हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे चालण्यापूर्वी आणि चालल्यानंतर योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे, विशेषतः उन्हाळ्यात. जर तुम्ही खूप जास्त लांब चालणार असाल, तर चालताना मध्ये - मध्ये पाणी पित राहावे.
चूक ५ :- हेव्ही नाश्ता केल्यानंतर वेगाने चालणे :-
काही लोक खाल्ल्यानंतर किंवा नाश्ता केल्यानंतर लगेच वेगाने चालायला सुरुवात करतात, जे हृदयासाठी हानिकारक ठरू शकते. खाल्ल्यानंतर शरीरातील जास्तीत जास्त ऊर्जा अन्न पचविण्यात खर्च होते. अशावेळी जर तुम्ही वेगाने चाललात, तर हृदयाला जास्त काम करावे लागते. त्यामुळे खाल्ल्यानंतर किमान ३० ते ४५ मिनिटे थांबूनच चालायला सुरुवात करावी आणि सुरुवात हलक्या गतीने करावी.
चूक ६ :- अनियमित चालण्याची सवय :-
काही लोक अनेक दिवस चालत नाहीत आणि मग अचानक एखाद्या दिवशी जास्त वेळ चालतात. ही अनियमितता हृदयासाठी चांगली नसते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी दररोज ३० ते ४५ मिनिटे नियमित चालणे आवश्यक आहे.
चूक ७ :- प्रदूषण किंवा धुर असलेल्या भागात चालणे :-
जर तुम्ही अशा ठिकाणी चालत असाल जिथे वाहनांचा धूर किंवा प्रदूषण जास्त आहे, तर ते तुमच्या फुफ्फुसांसाठी आणि हृदयासाठी दोन्हींसाठी हानिकारक ठरू शकते. शक्यतो बागेत किंवा हिरवळ असलेल्या ठिकाणी चालण्याचा प्रयत्न करा आणि सकाळच्या वेळेस ताज्या हवेत फेरफटका मारा.