Vitamin D Deficiency: उन्हात जाणं होत नाही? ५ पदार्थ रोज खा- व्हिटॅमिन डी भरपूर मिळेल

Updated:June 19, 2025 12:39 IST2025-06-19T12:33:38+5:302025-06-19T12:39:43+5:30

Vitamin D Deficiency: उन्हात जाणं होत नाही? ५ पदार्थ रोज खा- व्हिटॅमिन डी भरपूर मिळेल

हल्ली बऱ्याच लोकांची लाईफस्टाईल अशी झाली आहे की त्यांचं अजिबातच उन्हात जाणं होत नाही. दिवसातला अधिकाधिक काळ ते एसीमध्ये असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होते.

Vitamin D Deficiency: उन्हात जाणं होत नाही? ५ पदार्थ रोज खा- व्हिटॅमिन डी भरपूर मिळेल

शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर त्यामुळे हाडं कमजोर होत जातातं. शिवाय हृदयरोगाचा धोकाही वाढतो आणि थकवा, अशक्तपणा नेहमीच येतो. त्यामुळे शरीरातली व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढणं खूप गरजेचं आहे.

Vitamin D Deficiency: उन्हात जाणं होत नाही? ५ पदार्थ रोज खा- व्हिटॅमिन डी भरपूर मिळेल

काही पदार्थ तुम्ही नियमितपणे खाल्ल्यास शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता नक्कीच दूर होऊ शकते (vitamin D rich veg food). त्यापैकी पहिला पदार्थ आहे मशरूम. मशरूम हा व्हिटॅमिन डी चा एक चांगला स्त्रोत मानला जातो. जर मशरूमची कोणतीही रेसिपी करण्यापुर्वी तुम्ही ते कापून १० ते १५ मिनिटांसाठी उन्हात ठेवले तर त्यातील व्हिटॅमिन डी चे प्रमाण आणखी वाढते, असं एक्सपर्ट सांगतात.

Vitamin D Deficiency: उन्हात जाणं होत नाही? ५ पदार्थ रोज खा- व्हिटॅमिन डी भरपूर मिळेल

पनीरमधूनही व्हिटॅमिन डी, प्रोटीन्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे आठवड्यातून दोन- तीन वेळा पनीर खायला हरकत नाही.

Vitamin D Deficiency: उन्हात जाणं होत नाही? ५ पदार्थ रोज खा- व्हिटॅमिन डी भरपूर मिळेल

पनीरप्रमाणेच चीजमधूनही चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते. पाेळी, पराठा, ब्रेड, डोसा, उत्तपा अशा वेगवेगळ्या पदार्थांवर तुम्ही चीज घालून खाऊ शकता.

Vitamin D Deficiency: उन्हात जाणं होत नाही? ५ पदार्थ रोज खा- व्हिटॅमिन डी भरपूर मिळेल

हल्ली बाजारात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात देणारं फोर्टीफाईड दूध मिळतं. या दुधात आपल्या नेहमीच्या दुधापेक्षा खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी असतं. आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हे दूधही घेऊ शकता.

Vitamin D Deficiency: उन्हात जाणं होत नाही? ५ पदार्थ रोज खा- व्हिटॅमिन डी भरपूर मिळेल

दुधाप्रमाणेच बाजारात फोर्टीफाईड फूडही मिळतं. सकाळी नाश्त्यासाठी व्हिटॅमिन डी देणाऱ्या फोर्टीफाईड पदार्थांचा विचारही तुम्ही करू शकता.