Useful Bra hacks : ब्रेसिअरच्या स्ट्रिप्स मागून दिसतात, वर सरकतात? फक्त १ सोपी ट्रिक, फिटिंग परफेक्ट
Updated:November 27, 2022 13:07 IST2022-11-27T12:53:42+5:302022-11-27T13:07:38+5:30
Useful Bra hacks : अयोग्य ब्रा फिटिंगमुळे तुमचा पाठीचा पोस्चर खराब होऊ शकतो.

ब्रेसिअर वापरणं गरेजचं असतं तितकंच ते त्रासदायक पण असू शकतं. ब्राशी संबं गाधित अनेक समस्या आहेत ज्या आपल्याला अनेकदा त्रास देतात. उदाहरणार्थ, ब्राचा पट्टा वारंवार सरकणे. आता जर ब्रा ची फिटिंग बरोबर नसेल, तर ती नुसतीच अस्वस्थ वाटत नाही तर ती तुमच्या आरोग्यसाठीही योग्य नाही.
जर तुम्ही दिवसभर अयोग्य ब्रा घालत असाल तर त्याचा तुमच्या पाठीवर परिणाम होतो. ब्रा सोबत येणारी पहिली समस्या म्हणजे मागचा पट्टा आपोआप वर सरकू लागतो. असं का होतं, त्याचं सोल्यूशन काही आहे?
ब्राचे फिटिंग योग्य नसेल किंवा बेल्ट पट्टा हुकच्या बाजूने सैल होत आहे. तुम्ही बाजूच्या पट्ट्या खूप घट्ट ठेवल्या आहेत. दुसरे कारण असे असू शकते की तुमच्या ब्राची क्वालिटी खराब असेल. मागच्या पट्ट्याचा लवचिक भाग सैल झालेला असू शकतो.
याशिवाय तुम्ही तुमची ब्रा वारंवार हाय स्पीड मशिनवर धुत असल्यामुळे तिचे अलाइनमेंट बिघडले आहे. पाठीची चरबी वाढल्यानंतरही तुम्ही जुन्या नंबरची ब्रा घालत असाल तर पट्टा वर सरकू शकतो.
जर मागचा पट्टा खूप घट्ट असेल तर तो एका सेटिंगने सैल करा कारण यामुळे पाठीची चरबी वाढलेली दिसेल आणि तुमच्या त्वचेला त्रास होईल. समस्या अजूनही कायम राहिल्यास, तुम्हाला ब्रा बदलण्याची आवश्यकता आहे.
१) ब्रा चुकीच्या पद्धतीनं घातल्यानं पाठीची चरबी लक्षणीयरीत्या वाढू लागते.
२) अयोग्य ब्रा फिटिंगमुळे तुमचा पाठीचा पोस्चर खराब होऊ शकतो.
३) तुम्हाला पाठदुखी किंवा बरगड्या दुखण्याची समस्या देखील उद्भवू शकते.