धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
Updated:May 20, 2025 17:26 IST2025-05-20T17:11:32+5:302025-05-20T17:26:38+5:30
टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया...

आपण सर्वजण आपलं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः बाथरूम आणि टॉयलेट, कारण आपल्याला वाटतं की या ठिकाणी जास्त बॅक्टेरिया असू शकतात. परंतु अलिकडच्या काळात झालेल्या विविध रिसर्चमधून धक्कादायक खुलासे झाले आहेत. आपल्या घरात किंवा आजुबाजुला अशा काही गोष्टी आहेत ज्या टॉयलेट सीटपेक्षा कितीतरी पटीने घाणेरड्या असू शकतात.
ज्या गोष्टींची नावं या यादीत समाविष्ट आहेत त्यांना आपण दिवसातून अनेक वेळा स्पर्श करतो आणि त्या वापरतो. आता जर यामध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतील तर अर्थातच यापासून आजार होण्याचा धोकाही जास्त असेल. टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया...
स्मार्टफोन
रिसर्चनुसार, तुमच्या स्मार्टफोनवर टॉयलेट सीटपेक्षा १० पट जास्त बॅक्टेरिया असू शकतात. आपण स्वयंपाकघर असो, बाथरूम असो किंवा बेडरूम असो, सर्वत्र आपला फोन आपण आपल्यासोबतच ठेवतो.
लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि क्वीन मेरी, लंडन विद्यापीठातील संशोधकांनी २०११ मध्ये एक रिसर्च केला ज्यामध्ये १२ शहरांमध्ये ३९० स्मार्टफोन आणि ते वापरणाऱ्यांच्या हातांचे ७८० स्वॅब सँपल घेतले गेले. रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, सरासरी स्मार्टफोनवर टॉयलेट सीटपेक्षा १० पट जास्त बॅक्टेरिया असतात, ज्यामध्ये ई. कोलाय सारख्या धोकादायक बॅक्टेरियाचा समावेश आहे.
टीव्ही रिमोट
चर्चिल होम इन्शुरन्सच्या एका रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, टीव्हीचा रिमोट टॉयलेट सीटपेक्षा १५ पट जास्त घाणेरडा असू शकतो. कारण दिवसातून सरासरी १५० वेळा त्याला स्पर्श केला जातो आणि बहुतेक लोक तो कधीही स्वच्छ करत नाहीत.
रीयूजेबल पाण्याची बाटली
अमेरिकेतील वॉटरफिल्टरगुरू डॉट कॉमने केलेल्या रिसर्चनुसार, पुन्हा वापरता येण्याजोग्या पाण्याच्या बाटल्या टॉयलेट सीटपेक्षा ४०,००० पट जास्त घाणेरड्या असू शकतात. या बाटल्यांमध्ये बॅक्टेरिया आणि बॅसिलससारखे जंतू असतात, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
उशीचं कव्हर
रात्री ज्या उशीवर तुम्ही झोपता ती टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरडी असू शकते. आपले केस, स्काल्प, घाम आणि तेल उशाच्या कव्हरवर जमा होतं, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढतात. म्हणूनच ते नियमितपणे धुणं महत्वाचं आहे.
बाथ स्पंज
बाथरूममध्ये वापरल्या जाणाऱ्या बाथ स्पंजमध्ये टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया असू शकतात. ओलावा आणि उष्णतेमुळे त्यात बॅक्टेरिया वेगाने वाढतात. ते नियमितपणे स्वच्छ करणं किंवा वेळोवेळी बदलणं आवश्यक आहे.
रेस्टॉरंट मेनू कार्ड
जर्नल ऑफ मेडिकल व्हायरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार, रेस्टॉरंट्सच्या प्लास्टिक कोटेड मेनू कार्डवर व्हायरस आणि बॅक्टेरिया अनेक दिवस एक्टिव्ह राहू शकतात. त्यामुळे रेस्टॉरंटमध्ये जेवण ऑर्डर करण्यापूर्वी मेनू वाचून आपण आपले हात घाणेरडे करतो.
ऑफिस कीबोर्ड आणि माउस
अॅरिझोना विद्यापीठाचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. चार्ल्स गेर्बा यांच्या मते, कम्पूटर कीबोर्ड आणि माउसमध्ये टॉयलेट सीटपेक्षा कितीतरी पट जास्त बॅक्टेरिया असू शकतात. विशेषतः जेव्हा खूप लोक त्याचा वापर करतात.
या गोष्टी ठेवा लक्षात
नियमित स्वच्छतेचं महत्त्व समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. स्मार्टफोन, टीव्ही रिमोट, कीबोर्ड आणि माऊस नियमितपणे जंतुनाशक वाइप्सने स्वच्छ करा. रीयूजेबल पाण्याच्या बाटल्या दररोज कोमट पाणी आणि साबणाने धुवा. आठवड्यातून एकदा उशांचं कव्हर धुवा. रेस्टॉरंट्समध्ये काळजी घ्या. मेनू कार्डला स्पर्श केल्यानंतर हात धुवा किंवा सॅनिटायझर वापरा.