उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल

Published:March 5, 2023 01:04 PM2023-03-05T13:04:55+5:302023-03-05T13:52:44+5:30

Top 5 Ways to Prevent Summer UTI : जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर त्रास टाळण्यासाठी लवकरात लवकर डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल

उन्हाळ्याच्या दिवसात लघवीच्या जाही संसर्ग होणे ही सर्रास आढळून येणारी आणि अतिशय वेदनादायक समस्या आहे. याचा त्रास कोणालाही होऊ शकतो, उन्हाळ्यात याचे प्रमाण खूप जास्त वाढते. उन्हाळ्यातील उष्ण व आर्द्र हवामानामुळे हा त्रास होण्याचा धोका वाढतो. (Here's How You Can Avoid UTIs This Summer)

उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल

मूत्रमार्गामध्ये जेव्हा जिवाणूंचा शिरकाव होतो आणि त्यांची अनेक पटींनी वाढ होते तेव्हा तिथे संसर्ग होतो. परत-परत लघवीला जावेसे वाटणे, लघवी करतेवेळी जळजळ होणे, थोडीथोडी लघवी होणे, लाल रंगाची, ढगाळ किंवा उग्र वासाची लघवी होणे, पोटाच्या खालच्या भागात, हिप बोनच्या मध्ये वेदना होणे ही मूत्रमार्गामध्ये संसर्ग झाल्याची लक्षणे आहेत.

उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल

जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर त्रास टाळण्यासाठी लवकरात लवकर डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. हा संसर्ग किडनीपर्यंत पोहोचला तर भरपूर ताप, थंडी वाजून येणे, मळमळणे, उलट्या होणे असे त्रास होऊ शकतात.

उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल

डॉ. वैशाली जोशी सांगतात, ''मूत्रमार्गातील संसर्ग सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. वृद्ध आणि महिलांमध्ये ही समस्या सर्रास आढळून येते. रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या एस्ट्रोजेन स्तरांमध्ये घट होऊन मूत्रमार्गामध्ये बदल होत असल्याने हा त्रास होण्याची शक्यता वाढते.''

उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल

भरपूर पाणी प्या: शरीर हायड्रेटेड असेल तर मूत्रमार्गामधून जिवाणू बाहेर पडण्यास मदत होते व मूत्रमार्गात संसर्ग होणे टाळले जाते. दर दिवशी कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या. साखरयुक्त किंवा कॅफिन असलेली पेये घेणे टाळा, त्यामुळे मुत्राशयाला त्रास होऊ शकतो.

उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल

सैलसर कपडे वापरा: घट्ट कपड्यांमध्ये मॉइश्चर व उष्णता धरून ठेवली जाते, जिवाणूंच्या वाढीसाठी हे दोन्ही अनुकूल ठरतात. उष्ण व आर्द्र हवामानात सैलसर, हवा खेळती राहील असे कपडे वापरा, त्यामुळे संसर्ग टाळण्यात मदत होईल.

उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल

जेव्हा जेव्हा लघवीची भावना होईल तेव्हा प्रत्येकवेळी वॉशरूमला जा: लघवी खूप काळ रोखून धरल्यास मूत्रमार्गात जिवाणूंची संख्या अनेक पटींनी वाढू शकते. वारंवार, खासकरून संभोग किंवा व्यायाम केल्यानंतर लघवीला जा.

उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल

योग्य स्वच्छता राखा: लघवी केल्यानंतर पुढून पाठपर्यंत सर्व भाग स्वच्छ करा, असे केल्यास गुद्द्वारातील जिवाणू मूत्रमार्गात पसरणे टाळता येईल. संभोग करण्याच्या आधी आणि नंतर जननेंद्रिये स्वच्छ करा. योनीमधील जिवाणूंचे नैसर्गिक संतुलन बिघडेल अशी कोणतीही स्वच्छता उत्पादने वापरणे टाळा.

उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल

आरोग्याला पोषक आहार घ्या: फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेतल्यास शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते, मूत्रमार्गात आरोग्यदायक जिवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होणे टाळता येऊ शकते.

उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल

नियमितपणे व्यायाम करा: नियमितपणे व्यायाम केल्यास तुमच्या एकंदरीत आरोग्यात सुधारणा होऊ शकते तसेच रक्ताभिसरणामध्ये सुधारणा होऊन शरीराची रोगप्रतिकार क्षमता मजबूत होते . यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होणे टाळता येते.

उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल

ताणतणावांचे व्यवस्थापन: ताणतणावांमुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता कमजोर होऊ शकते आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. दीर्घ श्वसन, ध्यानधारणा, योगसाधना यासारख्या तंत्रांचा वापर करून ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल

धूम्रपान करू नका: धुम्रपानामुळे मूत्रमार्गाचे नुकसान होऊ शकते तसेच शरीराची रोगप्रतिकार क्षमता कमकुवत होते. त्यामुळे मूत्रमार्गात संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

उन्हाळ्यात लघवीच्या जागी जळजळ होते? डॉक्टरांनी सांगितल्या ५ टिप्स, नाजूक जागेचं इन्फेक्शन टळेल

(कन्सल्टन्ट, ओब्स्टेट्रीशियन आणि गायनॅकोलॉजिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई)