डोके दुखतं, उदासही वाटतं, लगेच थकता... दुर्लक्ष नको! वेळीच व्हा सावध, 'या' आजाराचा गंभीर धोका
Updated:June 26, 2025 18:28 IST2025-06-26T18:19:37+5:302025-06-26T18:28:17+5:30
how thyroid affects your body: signs your thyroid is off balance: common thyroid mistakes: थायरॉईडमुळे शरीरात होतात मोठे बदल, दुर्लक्ष केल्यास वाढतो धोका- ९० टक्के लोक करतात ही चूक

थायरॉईड ही आपल्या शरीराची महत्त्वाची ग्रंथी आहे. यामुळे चयापचय नियंत्रणात राहते. परंतु, अनेकवेळा याचे कार्य नीट न झाल्यास समस्यांना सामोरे जावे लागतात. (how thyroid affects your body)
आपल्या थायरॉईडवर परिणाम झाल्यास शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या आजारामध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वेदना जाणवतात. जाणून घेऊया या बद्दल सविस्तर (signs your thyroid is off balance)
थायरॉईडच्या ग्रंथीवर परिणाम झाल्यास आपल्या मानेमध्ये सूज येऊ शकते. ज्यामुळे मानेत जडपणा येणे किंवा दाब येऊ शकतो.अनेकदा मानेला स्पर्श केल्यानंतरही वेदना होऊ शकतात.
थायरॉईड संप्रेरकाच्या गडबडीमुळे स्नायू आणि सांध्यामध्ये कडकपणा आणि वेदना होऊ शकतात. यासोबतच हायपोथायरॉईडीझम होऊ शकतो. ज्यात सतत आळस येणे, स्नायू कमकुवत होणे, चालताना किंवा उठताना पाय दुखणे, थकवा किंवा वेदना जाणवतात.
याच्या असंतुलनामुळे आपल्या मेंदूवरही परिणाम होतो. थॉयरॉईडची समस्या असल्यास डोके जड वाटू शकते. वारंवार डोकेदुखी होऊन मायग्रेनचा त्रास वाढतो.
यामुळे आपल्या शरीरातील चयापचय प्रक्रिया मंदावते. त्यामुळे शरीरात सूज, अशक्तपा आणि थकवा येतो. त्यामुळे पाठदुखी आणि कंबरदुखीसारख्या समस्या उद्भवतात.