हाता - पायांवर आधी दिसतात किडनी डॅमेजची 'ही' लक्षणं, यांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जीवाशी खेळ
Updated:January 9, 2026 12:14 IST2026-01-09T11:12:32+5:302026-01-09T12:14:46+5:30
Kidney Damage Symptoms : किडनीमध्ये बिघाड जर झालाच तर सगळ्यात आधी याचे संकेत आपले हात आणि पायांवर दिसतात. पण अनेकदा लोक या संकेतांना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात.

Kidney Damage Symptoms : किडनी आपल्या शरीरात फिल्टरचं काम करतात. किडनी रक्त फिल्टर करून त्यातील विषारी तत्व आणि शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढतात. पण जेव्हा किडनींमध्ये काही बिघाड होतो, तेव्हा त्या योग्य पद्धतीने काम करत नाहीत. याचा प्रभाव आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. किडनीमध्ये बिघाड जर झालाच तर सगळ्यात आधी याचे संकेत आपले हात आणि पायांवर दिसतात. पण अनेकदा लोक या संकेतांना सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. अशात आज आपण हात आणि पायांवर दिसणारे संकेत बघणार आहोत.
किडनीची शरीरातील कामं
किडनींचं काम केवळ शरीरातील विषारी तत्व बाहेर काढणं नाही. तर शरीरात पाणी, मीठ आणि मिनरल्स जसे की, पोटॅशिअम-कॅल्शिअममध्ये संतुलन ठेवणं हेही असतं. इतकंच नाही तर ब्लड प्रेशर कंट्रोल करणारे आणि रक्त बनवण्यात मदत करणारे हार्मोन्स देखील किडनीद्वारे तयार केले जातात. त्यामुळे जर किडनीमध्ये काहीही बिघाड झाला तर पूर्ण शरीर प्रभावित होतं.
हात - पायांवर सूज
हात, पाय आणि टाचांवरील सूज हा किडनीमध्ये काहीतरी गडबड असल्याचा मोठा संकेत असतो. जर सूज आलेल्या जागेवर बोटाने दाब दिला आणि तेथील त्वचा आत गेली आणि हळूहळू वर आली तर समजून घ्या की, शरीरात पाणी जमा होत आहे. हा किडनी कमजोर झाल्याचा स्पष्ट इशारा आहे.
स्नायूंमध्ये सतत वेदना
किडनी डॅमेज झाल्यावर स्नायूंमध्ये तणाव आणि अचानक आखडलेपणा जाणून शकतो. असं होण्यामागचं कारण म्हणझे किडनी इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडवतात. पायांच्या स्नायूंमध्ये वेदना आणि आखडलेपणा या समस्येचे सुरूवातीचे संकेत असू शकतात.
त्वचेवर खाज - कोरडेपणा
जर हात किंवा त्वचेवर जास्त खाज, कोरडेपणा किंवा रॅशेज दिसत असतील, तर याकडे अजिबात दुर्लक्ष करूी नका. या गोष्टी तेव्हाच होतात, जेव्हा किडनी रक्तातून विषारी तत्व बाहेर काढू शकत नाहीत. हे विषारी तत्व त्वचेत जमा होतात, ज्यामुळे खाज आणि जळजळ होते.
हात - पायांमध्ये झिणझिण्या
हात आणि पायांमध्ये झिणझिण्या किंवा सुन्नपणा देखील किडनीमध्ये बिघाडाचे संकेत असू शकतात. किडनी डॅमेज झाल्याने नसांवर प्रभाव पडतो. ज्याला मेडिकल भाषेत पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणतात. यामुळे हात आणि पायांमध्ये वेगळीच जाणीव होते.
सतत थकवा - कमजोरी
पायांमध्ये सतत वेदना, कमजोरी किंवा थकवा सुद्धा किडनीसंबंधी समस्यांकडे इशारा करतो. शरीरात टॉक्सिन जमा झाल्याने हाडं आणि स्नायूवर प्रभाव पडतो. जर यातील कोणतंही लक्षण दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. किडनीची टेस्ट करा, कारण वेळीच जर निदान झालं तर किडनी पूर्ण डॅमेज होणं टाळता येऊ शकतं.