Join us

अनियमित मासिक पाळी- PCOS ने वैतागलात? हार्मोनल त्रास कमी करते 'हे' पाणी, बदला जीवनशैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2025 18:28 IST

1 / 7
हल्ली पीसीओएस सारख्या गंभीर आजार अनेक महिलांना सतावत आहे.(PCOS home remedies) यामुळे मासिक पाळीचे गणित देखील बिघडते. मासिक पाळी वेळेवर न येणे, दोन ते तीन महिन्यांनी मासिक पाळी येणे, अधिक रक्तस्त्राव होणे यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. (Ayurvedic drink for hormonal imbalance)
2 / 7
पीसीओएस असणाऱ्या महिलांना अनियमित मासिक पाळी, मुरुमे, लठ्ठपणा किंवा चेहऱ्यावर केस येणे, वंध्यत्व यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. (Natural remedies for irregular periods)
3 / 7
आहारात आणि जीवनशैलीत काही बदल केला आणि औषधांच्या मदतीने आपल्याला यावर मात करता येते. परंतु, सतत औषध खाण्याचा देखील आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अशावेळी काही आयुर्वेदिक उपाय केले तर असंतुलित हार्मोन्स नियंत्रणात येतील.
4 / 7
मेथीचे दाणे रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. हे पाणी २१ दिवस प्यायल्याने मासिक पाळी नियमित येण्यास मदत होईल. मेथीच्या बियांमध्ये इन्सुलिन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
5 / 7
आवळ्याच्या रसात कोरफडीचा रस मिसळा. हे सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे हार्मोन्स डिटॉक्स करण्यास मदत करते. तसेच पचनशक्ती चांगली होते.
6 / 7
दालचिनी आणि शतावरीचा चहा बनवून प्या. यामुळे आपले हार्मोन्स सुरळीत होण्यास मदत होते. यामध्ये असणारे घटक पोटाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.
7 / 7
सुती कापडामध्ये ओवा, मेथी आणि जिरे घाला. त्याची पोटली तयार करुन गरम करा. रात्री झोपण्यापूर्वी ही पोटली १५ मिनिटे ओटीपोटीवर ठेवा. ज्यामुळे रक्तसंचय सुरळीत आणि कमी होण्यास मदत होईल.
टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यआरोग्य