स्वयंपाक घरातला 'हा' मसाला आहे व्हिटॅमिन B12 चा खजिना- शाकाहारींसाठी तर B12 चं पॉवरहाऊस
Updated:August 27, 2025 14:28 IST2025-08-27T14:22:26+5:302025-08-27T14:28:24+5:30

बहुसंख्य शाकाहारी लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असते.
त्यामुळे हातापायांना मुंग्या येणे, मन अस्थिर असणे, अशक्तपणा, थकवा असे कित्येक त्रास होतात.
ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमी प्रमाणात असते त्यांना सतत डिप्रेशन येणं, मुड स्विंग हाेणं, कोणताही निर्णय घ्यायला त्रास होणं असे त्रास होतात.
हे त्रास कमी करण्यासाठी शरीरातलं व्हिटॅमिन बी १२ वाढवायला हवं. त्यासाठी स्वयंपाक घरातले काही पदार्थ नक्कीच मदत करतात आणि त्यापैकी एक म्हणजे ओवा.
याविषयी न्यूज१८ ने दिलेल्या माहितीनुसार ओव्यामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ नसले तरी त्याच्यात असे काही एन्झाईम्स असतात जे आहारातील बी १२ शरीरात व्यवस्थित शोषून घेण्यासाठी मदत करतात.
याशिवाय पचनक्रिया अधिक चांगली होण्यासाठी, गॅसेस, ॲसिडीटी हा त्रास कमी होण्यासाठीही व्हिटॅमिन बी १२ जास्त उपयुक्त ठरते.
ओव्यामध्ये थायमॉल नावाचा घटक असतो. त्यामध्ये ॲण्टीबॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठीही ओवा उपयुक्त ठरतो.