मेनोपॉज जवळ असल्याची लक्षणं कोणती? मासिक पाळी बंद होताना छळतो कोणता भयानक त्रास..

Updated:June 13, 2025 19:35 IST2025-06-13T19:01:15+5:302025-06-13T19:35:18+5:30

see What are the signs that menopause is approaching? terrible pain women to suffer, see at what age your period stops? : पाळी बंद होण्याची वेळ जवळ आली आहे हे कसे ओळखावे? कोणत्या वयात पाळी बंद होऊ शकते. जाणून घ्या.

मेनोपॉज जवळ असल्याची लक्षणं कोणती? मासिक पाळी बंद होताना छळतो कोणता भयानक त्रास..

मुलीला मासिक पाळी सुरु झाली की मुलगी वयात आली असे म्हटले जाते. पाळी येणे हे प्रजननासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. पाळी जशी सुरु होते तशीच एका ठराविक वयानंतर बंदही होते. सगळ्यांची सारख्याच वयात बंद होत नाही. वेळ काळ वेगळा असतो.

मेनोपॉज जवळ असल्याची लक्षणं कोणती? मासिक पाळी बंद होताना छळतो कोणता भयानक त्रास..

महिलांमध्ये मासिक पाळी बंद होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला मेनोपॉज असे म्हणतात. महिलेच्या आयुष्यातील प्रजननक्षमता संपुष्टात आल्याचे ते लक्षण आहे. मेनोपॉज नंतर पाळी बंद होते आणि मुल-बाळ होत नाही. साधारणपण वयाच्या ४५ ते ५२ वर्षापर्यंत मेनोपॉज कधीही होऊ शकतो. काही महिलांना चाळीशी किंवा त्या आधीही मेनोपॉज सुरु होतो.

मेनोपॉज जवळ असल्याची लक्षणं कोणती? मासिक पाळी बंद होताना छळतो कोणता भयानक त्रास..

मेनोपॉज सुरु होण्याची काही लक्षणे असतात. पाळी येणे कमी होते. रक्तस्त्राव कमी जास्त होतो. नेहमीपेक्षा प्रक्रिया वेगळी असल्याचे जाणवते. पाळीच्या चक्रात विविध बदल जाणवतात.

मेनोपॉज जवळ असल्याची लक्षणं कोणती? मासिक पाळी बंद होताना छळतो कोणता भयानक त्रास..

घाम येण्याचे प्रमाण वाढते. सारखा घाम येतो आणि शरीर गरम असल्याचे जाणवते. छातीत तसेच मानेजवळ गरम जाणवायला लागते. चेहराही गरम झाल्यासारखे भासते. सतत शरीर घामट जाणवते.

मेनोपॉज जवळ असल्याची लक्षणं कोणती? मासिक पाळी बंद होताना छळतो कोणता भयानक त्रास..

पाळीच्या दिवसात होतात त्यापेक्षा जास्त मुडस्विंग्स होतात. चिडचिड होते तसेच सतत रडावेसे वाटते. उदास असल्यासारखे वाटते. अनेक भावना एकत्र जाणवतात. योनीजवळ खाज येते. तसेच कोरडेपणा जाणवतो. दुखायलाही लागते. त्यामुळे फार चिडचिड होते आणि काय करावे सुचत नाही.

मेनोपॉज जवळ असल्याची लक्षणं कोणती? मासिक पाळी बंद होताना छळतो कोणता भयानक त्रास..

झोप लागत नाही. रात्री भरपूर घाम सुटतो. सतत जाग येते. शांत झोपता येत नाही आणि त्यामुळे दिवसभर झोपाळ्यासारखे वाटत राहते. रात्री डोक्यात विचारांचे चक्र सुरु राहते. कोणत्याही गोष्टींचा विचार करुन ताण येतो.

मेनोपॉज जवळ असल्याची लक्षणं कोणती? मासिक पाळी बंद होताना छळतो कोणता भयानक त्रास..