बाहेरुन सौंदर्य तर आतून थंडावा.. पाहा मोगऱ्याचे पाणी देते कमालीचे फायदे, सुगंधही व औषधही

Updated:April 28, 2025 08:35 IST2025-04-28T08:30:50+5:302025-04-28T08:35:01+5:30

See how Mogra water offers amazing benefits, both aroma and medicine : मोगऱ्याचे फुल फक्त माळायला व वाहायला वापरु नका. पाहा आरोग्यासाठी किती चांगले असते.

बाहेरुन सौंदर्य तर आतून थंडावा.. पाहा मोगऱ्याचे पाणी देते कमालीचे फायदे, सुगंधही व औषधही

मोगरा, चाफा, गुलाब अशी फुले पाहील्यावरच फार प्रसन्न वाटते. केसात माळायला तसेच देवाला वाहायला विविध फुले आपण वापरतो. फुलांच्या सुगंधा समोर लाखोंचे परफ्युम फिके पडतील.

बाहेरुन सौंदर्य तर आतून थंडावा.. पाहा मोगऱ्याचे पाणी देते कमालीचे फायदे, सुगंधही व औषधही

काही फुलांचा फक्त सुगंध चांगला नसतो तर ती आरोग्यासाठी औषधी असतात, जसे की जास्वंद व गोकर्ण. ही फुले त्वचेसाठी केसांसाठी फार उपयुक्त ठरतात. असेच आणखी एक फुल आहे जे आपण वरचेवर वापरतो, मात्र त्याचे औषधी फायदे आपल्याला माहिती नाहीत.

बाहेरुन सौंदर्य तर आतून थंडावा.. पाहा मोगऱ्याचे पाणी देते कमालीचे फायदे, सुगंधही व औषधही

मोगरा हे फुल फार लोकप्रिय आहे. मोगऱ्याचा वास फार मनमोहक असतो. तसेच मोगऱ्याचा गजरा फार सुंदर दिसतो. तुम्ही कधी कोणाच्या घरी पाण्याच्या तांब्यात किंवा माठामध्ये मोगऱ्याची फुले पाहिली आहेत का?

बाहेरुन सौंदर्य तर आतून थंडावा.. पाहा मोगऱ्याचे पाणी देते कमालीचे फायदे, सुगंधही व औषधही

मोगऱ्याचे पाणी फार आरोग्यदायी असते. अनेक जण हे पाणी पितात. पाण्याची चव बदलत नाही. अगदी दोन फुले माठामध्ये किंवा तांब्यामध्ये टाकायची नंतर काढून टाकायची.

बाहेरुन सौंदर्य तर आतून थंडावा.. पाहा मोगऱ्याचे पाणी देते कमालीचे फायदे, सुगंधही व औषधही

मोगरा वासाला मस्त असतोच मात्र अँण्टी बॅक्टेरियलही असतो. त्यामुळे तो ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये वापरतात. तसेच दाहशामक असतो. नैसर्गिक थंडाव्याचा स्त्रोत आहे.

बाहेरुन सौंदर्य तर आतून थंडावा.. पाहा मोगऱ्याचे पाणी देते कमालीचे फायदे, सुगंधही व औषधही

मोगऱ्याचा सौम्य गंध मनाला शांतता देतो. त्यामुळे मानसिक आरोग्यासाठीही मोगऱ्याचे पाणी पिणे फायद्याचे ठरते. रिलॅक्स होण्यासाठी मोगरा उपयुक्त ठरतो.

बाहेरुन सौंदर्य तर आतून थंडावा.. पाहा मोगऱ्याचे पाणी देते कमालीचे फायदे, सुगंधही व औषधही

मोगऱ्याचे पाणी प्यायल्याने पचन सुधारते. गॅसेसचा त्रास तसेच अपचनाचा काही त्रास असेल तर मोगऱ्याचे पाणी फायदेशीर ठरते. मोगरा थंड असतो. पोटाला शांतता मिळते. दाह कमी होतो. तसेच शरीरातील उष्णता कमी होते.

बाहेरुन सौंदर्य तर आतून थंडावा.. पाहा मोगऱ्याचे पाणी देते कमालीचे फायदे, सुगंधही व औषधही

मोगऱ्याचे पाणी प्याच मात्र मोगऱ्याचा काढाही चांगलाच फायदेशीर ठरतो. करायला काही कष्ट नाहीत. फक्त ताजी फुले अगदी स्वच्छ धुऊन घ्या. नंतर पाण्यामध्ये ती फुले टाका आणि पाच मिनिटे उकळवा.