भाजलेलं आलं बहुगुणी! सांधेदुखीपासून वेटलॉसपर्यंत अनेक समस्यांवर असरदार - तब्येत राहील कायम ठणठणीत...
Updated:August 4, 2025 19:04 IST2025-08-04T18:40:33+5:302025-08-04T19:04:51+5:30
Roasted Ginger Can Be Beneficial in Many Problems : Health Benefits of roasted ginger : How to use roasted ginger : Natural remedy roasted ginger : आलं फक्त चवीसाठीच नाही, तर आरोग्याच्या इतर समस्यांसाठीही खूप फायदेशीर ठरतं...

रोजच्या जेवणात वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी आलं घातलं जातं. खरंतर, 'आलं' मसाल्यांच्या पदार्थांपैकी एक असून त्याचे औषधी (Roasted Ginger Can Be Beneficial in Many Problems) उपयोग देखील अनेक आहेत. विशेषतः पावसाळ्यात शरीराला आतून उष्णता मिळवून देण्यापासून ते पचनसंस्थेच्या मजबूतीपर्यंत, त्याचे अनेक फायदे आहेत. रोजच्या जेवणात थोडंसं कच्चं किंवा भाजून आलं खाल्ल्यास अनेक शारीरिक तक्रारींपासून नैसर्गिकरित्या संरक्षण मिळू शकते.
चहा, भाज्या किंवा चटणीमध्ये आलं घातलं की पदार्थांची ( Health Benefits of roasted ginger) चव वाढते आणि त्याला एक वेगळाच सुगंध येतो. परंतु हे आलं फक्त चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. रोजच्या जेवणात (How to use roasted ginger) आल्याचा समावेश केल्यास अनेक आरोग्य समस्या दूर राहतात. विशेषतः भाजून घेतलेलं आलं (Natural remedy roasted ginger) तर शरीरासाठी खूपच गुणकारी मानलं जातं. रोजच्या जेवणात भाजून आलं खाण्याचे काय फायदे आहेत आणि त्याचा आपल्या आरोग्यावर कसा सकारात्मक परिणाम होतो ते पाहूयात...
१. पचनशक्ती मजबूत करण्यासाठी :-
गॅस, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी अशा पचनासंबंधित तक्रारी दूर करण्यासाठी भाजलेलं आलं फायदेशीर मानलं जातं. जर उलट्या किंवा मळमळ होत असेल, तरीही अशावेळी भाजलेल्या आल्याचा तुकडा खाल्ल्यास आराम मिळतो. यामुळे पोट शांत राहतं आणि अन्नाचं नीट पचन होण्यास मदत होते.
२. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी :-
आयुर्वेदानुसार, भाजलेलं आलं नियमित खाल्ल्यास शरीरातील ब्लड शुगरची पातळी नियंत्रित राहते. आल्यामध्ये असे घटक असतात जे रक्तातील साखर वाढू देत नाहीत आणि इन्सुलिनच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतात. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी आहारात आल्याचा समावेश दररोज करावा.
३. वजन कमी करण्यासाठी :-
भाजलेलं आलं खाल्ल्याने शरीरातील कॅलोरीज बर्न होण्याची प्रक्रिया वेगाने होते आणि भूक नियंत्रणात राहते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते आणि वेटलॉस लवकर होण्यास मदत होते.
४. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी :-
जर आपण भाजलेलं आलं रोजच्या आहारात समाविष्ट केलं तर रोगप्रतिकारक शक्ती (इम्यूनिटी) मजबूत राहते. आल्यामधील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यात असणारी जीवनसत्त्व शरीराला मजबुती देतात आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण करतात.
५. दृदय निरोगी ठेवण्यासाठी :-
आल्यामुळे शऱूरातील कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) कमी होते. याशिवाय, रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रणात ठेवण्यासाठीही ते उपयुक्त ठरतं.भाजलेलं आलं खाल्ल्याने रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारत, ज्यामुळे हृदय निरोगी आणि बळकट राहतं.
६. सांधेदुखीचा त्रास :-
जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल, तर भाजलेलं आलं खाणं फायदेशीर ठरू शकतं. यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि वेदनांपासूनही आराम मिळतो.
७. स्ट्रेस होतो कमी :-
सकाळी आल्याचा चहा प्यायल्याने मन प्रसन्न होतं आणि ताजेतवाने वाटते. तसेच भाजलेल्या आल्याचा तुकडा खाल्ल्यानेही तणावाचं प्रमाण कमी होतं. आल्यामध्ये असलेल्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे स्ट्रेस आणि चिंता कमी होण्यास मदत होते.