ऐन तिशीत सांधे दुखतात, उठताबसता अंगदुखी छळतेय? ‘हे’ पदार्थ रोज खा, दुखणं जाईल पळून

Updated:January 6, 2026 17:49 IST2026-01-06T16:42:28+5:302026-01-06T17:49:17+5:30

ऐन तिशीत सांधे दुखतात, उठताबसता अंगदुखी छळतेय? ‘हे’ पदार्थ रोज खा, दुखणं जाईल पळून

वयाचा आणि कोणत्याही आजाराचा आता काहीही संबंध राहिलेला नाही. म्हणूनच तर अगदी तरुण वयातच पाठ, कंबर, गुडघे दुखत आहेत, अंग आखडून गेलं आहे, अशी कित्येकांची तक्रार असते...(reasons and causes of muscle pain at early age)

ऐन तिशीत सांधे दुखतात, उठताबसता अंगदुखी छळतेय? ‘हे’ पदार्थ रोज खा, दुखणं जाईल पळून

याची अनेक कारणं आहेत. आहारात कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन डी अशा घटकांची कमतरता असणं, बसण्याची किंवा उभं राहण्याची चुकीची पद्धत, बैठ्या कामाचे वाढलेले तास, व्यायामाचा अभाव, वाढलेलं वजन या सगळ्यांमुळे कमी वयातच हाडांचं दुखणं मागे लागत आहे. तर काही घटकांच्या कमतरतेमुळे अंग दुखू लागतं.(food that helps to reduce muscle pain)

ऐन तिशीत सांधे दुखतात, उठताबसता अंगदुखी छळतेय? ‘हे’ पदार्थ रोज खा, दुखणं जाईल पळून

हा त्रास थांबवायचा असेल तर स्नायूंना मजबूती देऊन त्यांची ताकद वाढविण्यासाठी काही अन्नपदार्थ आपल्या आहारात नियमितपणे असायलाच हवेत असं जर्नल ऑफ बोन, मिनरल रिसर्च यांच्या अभ्यासातून समोर आलं आहे. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा...(how to get relief from muscle pain?)

ऐन तिशीत सांधे दुखतात, उठताबसता अंगदुखी छळतेय? ‘हे’ पदार्थ रोज खा, दुखणं जाईल पळून

पहिला पदार्थ म्हणजे सकाळी उठून १ ग्लास पाण्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर मिरेपूड आणि लसुणाच्या २ पाकळ्या कुटून टाका. हे पाणी काही मिनिटांसाठी उकळून घ्या. त्यानंतर गाळून कोमट प्या. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते.

ऐन तिशीत सांधे दुखतात, उठताबसता अंगदुखी छळतेय? ‘हे’ पदार्थ रोज खा, दुखणं जाईल पळून

गूळ आणि फुटाणे एकत्र करून खा. गुळामध्ये लोह असतं आणि फुटाण्यांमध्ये प्रोटीन्स. याशिवाय या दोन्ही पदार्थांमधून कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियमही भरपूर प्रमाणात मिळतं. त्यामुळे स्नायूंच्या मजबुतीसाठी गूळ- फुटाणे एकत्र करून खाणे खूप फायद्याचे ठरते.

ऐन तिशीत सांधे दुखतात, उठताबसता अंगदुखी छळतेय? ‘हे’ पदार्थ रोज खा, दुखणं जाईल पळून

मखाना खाणं हाडांसाठी तसेच स्नायूंसाठीही उपयुक्त ठरतं. त्यांच्यामध्ये असणारे फ्लावोनाईड्स शरीरावरची सूज कमी करून स्नायूंना उर्जा देण्यासाठी मदत करतात.

ऐन तिशीत सांधे दुखतात, उठताबसता अंगदुखी छळतेय? ‘हे’ पदार्थ रोज खा, दुखणं जाईल पळून

शरीरातला वात दोष कमी करण्यासाठी तूप देखील खूप फायदेशीर ठरतं. त्यामुळे अंग आखडल्यासारखं होत असेल, स्नायू दुखत असतील तर तूप देखील नियमितपणे खायला हवं.

ऐन तिशीत सांधे दुखतात, उठताबसता अंगदुखी छळतेय? ‘हे’ पदार्थ रोज खा, दुखणं जाईल पळून

पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे दोन्ही घटक भरपूर प्रमाणात देणारे खजूर स्नायूंचं दुखणं कमी करण्यासाठी मदत करतात.