तुम्ही फक्त स्वत:च्या ५ सवयी बदला, शुगर वाढण्याचे टेंशन विसरा-खाऊनपिऊन राहा आनंदी-डायबिटिस नियंत्रणात...

Updated:November 13, 2025 15:51 IST2025-11-13T15:34:20+5:302025-11-13T15:51:12+5:30

5 lifestyle changes to control diabetes effectively : how to manage diabetes naturally : healthy habits to control blood sugar : natural ways to reduce blood sugar : योग्य काळजी आणि वेळीच लक्ष दिल्यास डायबिटीसवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य होते...

तुम्ही फक्त स्वत:च्या ५ सवयी बदला, शुगर वाढण्याचे टेंशन विसरा-खाऊनपिऊन राहा आनंदी-डायबिटिस नियंत्रणात...

आपल्यापैकी अनेकांना डायबिटीसची समस्या सतावते. डायबिटीस म्हटलं की ते (healthy habits to control blood sugar) नियंत्रणात ठेवायचं म्हणजे अनेकांना याचे टेंन्शनच येते. डायबिटीस कायम नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त साखर खाणं सोडणं पुरेसं नाही.

तुम्ही फक्त स्वत:च्या ५ सवयी बदला, शुगर वाढण्याचे टेंशन विसरा-खाऊनपिऊन राहा आनंदी-डायबिटिस नियंत्रणात...

शरीरातल्या इन्सुलिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आहार, व्यायाम, झोप आणि नेहमीच्या ( natural ways to reduce blood sugar) काही सवयींमध्ये छोटे - छोटे पण परिणामकारक बदल करणे आवश्यक असते. योग्य काळजी आणि वेळीच लक्ष दिल्यास डायबिटीसवर नियंत्रण मिळवणे सहज शक्य होते. शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सोपे आणि नैसर्गिक उपाय पाहूयात.

तुम्ही फक्त स्वत:च्या ५ सवयी बदला, शुगर वाढण्याचे टेंशन विसरा-खाऊनपिऊन राहा आनंदी-डायबिटिस नियंत्रणात...

डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर सोडणे तर ठीक आहे, पण त्याहूनही जास्त महत्त्वाचे आहे की तुम्ही काय खात आहात. नेहमी पोषक आणि संतुलित आहार घ्यावा. पांढरा ब्रेड, मैदा आणि पांढरा भात याऐवजी भरडधान्ये जसे की, ज्वारी, ओट्स, ब्राऊन राईस आणि नाचणी यांचा आहारात समावेश करा. या धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, यामुळे रक्तामध्ये साखर हळूहळू मिसळते. याचबरोबर, हिरव्या पालेभाज्या, शेंगा, डाळी आणि फळे हे देखील फायबरचे उत्तम स्रोत आहेत. डाळी, टोफू आणि नट्स यांचाही आहारात समावेश करा. हे पदार्थ भूक नियंत्रित ठेवतात आणि इन्स्टंट एनर्जी मिळवून देण्यास मदत करतात.

तुम्ही फक्त स्वत:च्या ५ सवयी बदला, शुगर वाढण्याचे टेंशन विसरा-खाऊनपिऊन राहा आनंदी-डायबिटिस नियंत्रणात...

डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी एक्सरसाइज करणे गरजेचे असते. नियमित एक्सरसाइज केल्याने इन्सुलिनची पातळी योग्य पद्धतीने नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, यामुळे रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवता येते. त्याचबरोबर, व्यायामामुळे वजन कमी करण्यास मदत होते. थोडेसे वजन कमी केल्यानेही मधुमेह नियंत्रणात ठेवण्यात मोठा फायदा मिळू शकतो. दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे फास्ट वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग, योग किंवा कोणताही एरोबिक एक्सरसाइज नक्की करा.

तुम्ही फक्त स्वत:च्या ५ सवयी बदला, शुगर वाढण्याचे टेंशन विसरा-खाऊनपिऊन राहा आनंदी-डायबिटिस नियंत्रणात...

जास्त वजन, विशेषतः पोटाच्या आसपास जमा झालेली चरबी डायबिटीस वाढण्यास कारणीभूत ठरते. वजन नियंत्रित करण्यासाठी पोषक व पौष्टिक आहार आणि नियमित एक्सरसाइजवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. तुमचे फक्त ५ ते १०% वजन कमी केल्याने देखील रक्तातील साखरेच्या पातळीवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

तुम्ही फक्त स्वत:च्या ५ सवयी बदला, शुगर वाढण्याचे टेंशन विसरा-खाऊनपिऊन राहा आनंदी-डायबिटिस नियंत्रणात...

भरपूर जास्त स्ट्रेस घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. जेव्हा आपण खूप जास्त स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा आपल्या शरीरात कोर्टिसोल आणि एड्रेनालिन सारखे हार्मोन्स स्रवतात. जे लिव्हरमधील साखर रिलीज करून रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. प्राणायाम, मेडिटेशन आणि योग हे स्ट्रेस कमी करण्याचे उत्तम मार्ग आहेत. स्ट्रेस नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे देखील अत्यंत आवश्यक असते.

तुम्ही फक्त स्वत:च्या ५ सवयी बदला, शुगर वाढण्याचे टेंशन विसरा-खाऊनपिऊन राहा आनंदी-डायबिटिस नियंत्रणात...

आपले शरीर आतून दुरुस्त होण्यासाठी आणि पुन्हा ऊर्जा मिळवण्यासाठी ७ ते ८ तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप न घेतल्यास इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि भूक लागण्याचे हार्मोन्स असंतुलित होतात, ज्यामुळे गोड खाण्याची इच्छा वाढते. त्यामुळे दररोज ७ ते ८ तासांची चांगली आणि गाढ झोप घ्या. त्याचबरोबर, झोपण्याची एक वेळ निश्चित करा.