पाहा मोहरीचं तेल आणि हिंग एकत्र करून वापरण्याची कमाल, आरोग्यासोबतच सौंदर्यही खुलेल..

Updated:January 20, 2025 18:10 IST2025-01-20T18:05:39+5:302025-01-20T18:10:38+5:30

a

पाहा मोहरीचं तेल आणि हिंग एकत्र करून वापरण्याची कमाल, आरोग्यासोबतच सौंदर्यही खुलेल..

माेहरीचं तेल आणि हिंग यांचा एकत्रित वापर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. पचनापासून ते केसांची वाढ चांगली होण्यापर्यंत त्याचे कित्येक वेगवेगळे उपयोग आहेत.

पाहा मोहरीचं तेल आणि हिंग एकत्र करून वापरण्याची कमाल, आरोग्यासोबतच सौंदर्यही खुलेल..

इंडिया टुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहरीचं तेल आणि हिंग एकत्रित करून स्वयंपाकात वापरल्याने पचनाशी संबंधित त्रास कमी होऊ शकतात. फोडणीसाठी मोहरीचं तेल वापरणे आणि त्यामध्ये चिमूटभर हिंग घालणे असा एक उपाय तुम्ही करू शकता.

पाहा मोहरीचं तेल आणि हिंग एकत्र करून वापरण्याची कमाल, आरोग्यासोबतच सौंदर्यही खुलेल..

मोहरीचं तेल थोडं कोमट करावे आणि त्यात हिंग घालून डोक्याला मालिश करावी. यामुळे त्वचेखालील रक्ताभिसरण सुरळीत होऊन केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते. त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण बरंच कमी होतं.

पाहा मोहरीचं तेल आणि हिंग एकत्र करून वापरण्याची कमाल, आरोग्यासोबतच सौंदर्यही खुलेल..

मोहरीच्या तेलात चिमूटभर हिंग घालून त्वचेला मालिश केल्यास त्वचा चमकदार होते. पण असं करताना आधी पॅचटेस्ट जरूर घ्यावी.

पाहा मोहरीचं तेल आणि हिंग एकत्र करून वापरण्याची कमाल, आरोग्यासोबतच सौंदर्यही खुलेल..

सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठीही मोहरीचं तेल आणि हिंग हे मिश्रण खूप उपयुक्त ठरतं. यासाठी सुरुवातीला मोहरीचं तेल थोडं गरम करून घ्यावं आणि नंतर त्यामध्ये हिंग घालावा.

पाहा मोहरीचं तेल आणि हिंग एकत्र करून वापरण्याची कमाल, आरोग्यासोबतच सौंदर्यही खुलेल..

डोकं खूप दुखत असेल तर मोहरीच्या तेलात हिंग घालून डोक्याला मालिश करा. डोकेदुखी थांबेल.