Join us

रात्री झोपण्यापूर्वी रोज करा तळपायाला शुद्ध तुपाचा मसाज, मिळतील जबरदस्त फायदे- लागेल शांत झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2025 10:26 IST

1 / 7
पायांच्या तळव्याची मालिश केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात. यामुळे आपले रक्ताभिसरण सुधारते. दिवसभराचा थकवा देखील दूर होतो. (Ghee foot massage benefits)
2 / 7
अनेकजण तळपायाचा मसाज करण्यासाठी राईच्या तेलाचा वापर करतात. परंतु, आयुर्वेदानुसार पायांच्या तळव्याला तुपाने मालिश केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. (Foot massage with ghee for stress)
3 / 7
पायांच्या तळव्याला तुपाने मालिश केल्यास सांधेदुखी आणि सूज यापासून आराम मिळतो.
4 / 7
तळपायांची मालिश केल्याने दृष्टी सुधारते. डोळ्यांवर आलेला ताण आणि थकवा निघून जाण्यास मदत होते.
5 / 7
आपल्याला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर तळपायांना तुपाने मालिश करा. ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारेल. तसेच मानसिक आरोग्य देखील सुधारते.
6 / 7
तुपाने तळव्यांना मालिश केल्यास पचनसंस्था मजबूत होते. तळपायाच्या प्रेशर पॉइंटवर मसाज केल्यास गॅस आणि अपचनाची समस्या दूर होईल.
7 / 7
त्वचा वारंवार कोरडी होत असेल तर पायांना तुपाने मालिश करा. यामुळे त्वचेला आर्द्रता मिळेल. तसेच त्वचा कोरडी होण्यापासून सुटका होईल.
टॅग्स : आरोग्यलाइफस्टाइल