लिव्हर खराब करणारे हे पदार्थ खाणं कायमचं करा बंद, फक्त दारुनेच लिव्हर खराब होतं असं नाही..

Updated:June 9, 2025 17:30 IST2025-06-07T12:53:11+5:302025-06-09T17:30:20+5:30

Bad Foods For Liver : जर तुम्ही नेहमीच अनहेल्दी पदार्थ खात असाल आणि शरीराची हालचाल जास्त करत नसाल तर लिव्हरमध्ये गडबड व्हायला वेळ लागणार नाही.

लिव्हर खराब करणारे हे पदार्थ खाणं कायमचं करा बंद, फक्त दारुनेच लिव्हर खराब होतं असं नाही..

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हर अन्न पचवण्यासोबतच पचनासाठी आवश्यक एंझाइम्स तयार करतं. महत्वाची बाब म्हणजे लिव्हरमध्ये काही गडबड झाली तर लिव्हर स्वत:ला ठीक करू शकतं. पण एकदा जर लिव्हरमध्ये गंभीर बिघाड झाला तर शरीरातील इतर अवयव सुद्धा प्रभावित होतात. त्यामुळे मोठा फटका बसण्याआधी लिव्हर हेल्दी ठेवणं खूप गरजेचं असतं. जर तुम्ही नेहमीच अनहेल्दी पदार्थ खात असाल आणि शरीराची हालचाल जास्त करत नसाल तर लिव्हरमध्ये गडबड व्हायला वेळ लागणार नाही. हळूहळू लिव्हरसंबंधी आजार वाढू लागतील. अशात कोणते पदार्थ खाल्ल्यानं लिव्हर डॅमेज होऊ शकतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे.

लिव्हर खराब करणारे हे पदार्थ खाणं कायमचं करा बंद, फक्त दारुनेच लिव्हर खराब होतं असं नाही..

अल्कोहोल लिव्हरसाठी सगळ्यात घातक मानलं जातं. दारू प्यायल्यानं फॅटी लिव्हर, लिव्हरवर सूज आणि लिव्हरवर अल्सर यांसारख्या समस्या होतात. तसेच लिव्हर सिरोसिस आणि हेपेटायटिस होण्याचा धोकाही वेगानं वाढतो.

लिव्हर खराब करणारे हे पदार्थ खाणं कायमचं करा बंद, फक्त दारुनेच लिव्हर खराब होतं असं नाही..

जास्त तळलेलं आणि भाजलेले फॅटी पदार्थ लिव्हरसाठी घातक असतात. या पदार्थांमुळे लिव्हरमध्ये फॅट जमा होऊ लागतं. ज्यामुळे लिव्हरचं काम प्रभावित होतं.

लिव्हर खराब करणारे हे पदार्थ खाणं कायमचं करा बंद, फक्त दारुनेच लिव्हर खराब होतं असं नाही..

शुगर असलेल्या गोष्टी जसे की, ज्यूस, पॅकेज्ड फूड, कोल्ड ड्रिंक, सोडा पिणं टाळाल तरच लिव्हर निरोगी राहील. या गोष्टींमुळे लिव्हरवर सूज येते आणि लिव्हरची काम करण्याची क्षमताही कमी होते.

लिव्हर खराब करणारे हे पदार्थ खाणं कायमचं करा बंद, फक्त दारुनेच लिव्हर खराब होतं असं नाही..

पॅकेटमधील पदार्थ लिव्हरचे सगळ्यात मोठे वैरी असतात. बाजारात मिळत असलेल्या या फूड्समध्ये शुगर, मीठ आणि तेलाचं प्रमाण भरपूर असतं. याचा लिव्हरवर नकारात्मक प्रभाव पडतो.

लिव्हर खराब करणारे हे पदार्थ खाणं कायमचं करा बंद, फक्त दारुनेच लिव्हर खराब होतं असं नाही..

लिव्हरसाठी रिफाइंड धान्य जसे की, मैदा किंवा त्यापासून तयार गोष्टी नुकसानकारक असतात. लिव्हरसाठी ब्रेड, मेद्यापासून तयार पदार्थ, जंक फूड घातक ठरतात. हे पदार्थ आणि मेदा टाळला पाहिजे.

लिव्हर खराब करणारे हे पदार्थ खाणं कायमचं करा बंद, फक्त दारुनेच लिव्हर खराब होतं असं नाही..

भरपूर लोकांना जास्त मीठ खाण्याची सवय असते. जेवणात ते वरूनही मीठ घेतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, लिव्हरसाठी जास्त मीठ घातक असतं. जास्त मिठानं लिव्हरच्या काम करण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडतो. तसेच जास्त मिठामुळे हाय ब्लड प्रेशरचा धोकाही वाढतो.