एकदम झक्कास! चमचा सोडा, मस्त हाताने खा; परदेशातही वाढतेय आपल्या 'देसी स्टाईल'ची क्रेझ

Updated:May 31, 2025 16:11 IST2025-05-31T16:02:03+5:302025-05-31T16:11:34+5:30

हाताने जेवणं ही फक्त परंपरा नाही तर ते सायंटिफिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर आहे.

एकदम झक्कास! चमचा सोडा, मस्त हाताने खा; परदेशातही वाढतेय आपल्या 'देसी स्टाईल'ची क्रेझ

आजच्या आधुनिक युगात लोक चमच्याने आणि काट्याने जेवणं हे स्टाईल आणि स्वच्छतेचं प्रतीक मानतात. त्यामुळे आता आधीच्या काळातील हाताने जेवण्याची सवय हळूहळू कमी होत आहे. हाताने जेवणं ही फक्त परंपरा नाही तर ते सायंटिफिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर आहे.

एकदम झक्कास! चमचा सोडा, मस्त हाताने खा; परदेशातही वाढतेय आपल्या 'देसी स्टाईल'ची क्रेझ

भारतासह संपूर्ण जगात गेल्या काही दशकांत चमच्याने जेवण्याचा हा ट्रेंड वाढला आहे. विविध अभ्यासातून हातांनी अन्न खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे होतात हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे परदेशातही आता आपल्या 'देसी स्टाईल'ची क्रेझ वाढताना दिसत आहे.

एकदम झक्कास! चमचा सोडा, मस्त हाताने खा; परदेशातही वाढतेय आपल्या 'देसी स्टाईल'ची क्रेझ

संस्कृतीनुसार, आपलं शरीर पाच तत्वांपासून बनलेलं आहे आणि बोटं वेगवेगळ्या तत्वांची ओळख आहेत. अंगठा अग्नीशी संबंधित आहे, तर तर्जनी वायुशी संबंधित आहे. मधली बोट आकाशाशी आणि अनामिका बोट पृथ्वीशी संबंधित आहे, तर करंगळी जल म्हणजेच पाण्याशी संबंधित आहे. जेव्हा तुम्ही ही पाच बोटं एकत्र करून अन्न खाता तेव्हा त्याचा आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम होतो.

एकदम झक्कास! चमचा सोडा, मस्त हाताने खा; परदेशातही वाढतेय आपल्या 'देसी स्टाईल'ची क्रेझ

हातांनी जेवताना आपण किती खावं, काय खावं, कोणत्या वेगाने खावे हे समजू शकतो, ज्यामुळे पचन नीट होतं. हातांनी जेवल्याने अन्नाचं प्रमाण ठरवतो, ज्यामुळे अधिक अन्न खाणं टाळलं जातं.

एकदम झक्कास! चमचा सोडा, मस्त हाताने खा; परदेशातही वाढतेय आपल्या 'देसी स्टाईल'ची क्रेझ

हाताने खाल्ल्यामुळे आपली पचनसंस्था चांगली राहते आणि अन्न लवकर पचते. आयुर्वेदानुसार, जेव्हा तुम्ही तोंडात घास ठेवता तेव्हा तुम्ही योगमुद्रेच्या स्वरूपात बोटं हलवता, ज्यामुळे अन्न लवकर पचतं.

एकदम झक्कास! चमचा सोडा, मस्त हाताने खा; परदेशातही वाढतेय आपल्या 'देसी स्टाईल'ची क्रेझ

जेवताना जसा तुम्ही हात हलवता तसतसे शरीरातील अनेक गोष्टी बदलतात. यामुळे तुमच्या शरीराचे रक्ताभिसरण नीट होतं.

एकदम झक्कास! चमचा सोडा, मस्त हाताने खा; परदेशातही वाढतेय आपल्या 'देसी स्टाईल'ची क्रेझ

जेव्हा तुम्ही हाताने अन्न खाता तेव्हा तुमच्या बोटांच्या अन्नाचं तापमान जाणवतं आणि तुम्हाला अन्न किती गरम किंवा थंड आहे याचा अंदाज येतो. मेंदू त्यानुसार काम करतो.

एकदम झक्कास! चमचा सोडा, मस्त हाताने खा; परदेशातही वाढतेय आपल्या 'देसी स्टाईल'ची क्रेझ

हातांनी जेवण्यामागे आपला सांस्कृतिक संबंध देखील आहे. शास्त्रांमध्ये असं लिहिलं आहे की, अन्न ब्रह्म आहे, रस विष्णू आहे आणि भोक्ता महेश्वर आहे. हातांनी जेवल्याने आपण अन्नाबद्दल आपला आदर दाखवतो आणि आपल्या शास्त्रांमध्ये अन्न सेवनाशी संबंधित अनेक श्लोक आहेत.

एकदम झक्कास! चमचा सोडा, मस्त हाताने खा; परदेशातही वाढतेय आपल्या 'देसी स्टाईल'ची क्रेझ

हातांनी किंवा चमच्याने जेवणं हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार आहे. चमच्याने जेवलात म्हणजे तुम्ही आधुनिक आणि हाताने जेवलात तर तुम्ही जुन्या विचारांचे असं अजिबात नाही.

एकदम झक्कास! चमचा सोडा, मस्त हाताने खा; परदेशातही वाढतेय आपल्या 'देसी स्टाईल'ची क्रेझ

अनेकांना हातानेच जेवायला आवडतं. जेवल्याचं समाधान मिळतं. हातांनी जेवण्याचे शरीराला असंख्य फायदे होतात. मात्र जेवणाआधी आणि जेवल्यानंतर हात स्वच्छ धुणं अत्यंत आवश्यक आहे.